Wednesday, 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०७/१० - स्वची जाणीव (Self-awareness skill)

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास

दिवस ७

आजचा विषय - स्वची जाणीव. स्वतःला ओळखण्याची क्षमता (Self-awareness skill)

आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

ह्या विषयात शिकण्यासारखं बरंच काही आहे. उदा. अंतस्फुरणाचा (intuition) विकास, ध्यान (meditation), सजगता (mindfulness), स्वकार्यक्षमता (self efficacy), आत्मसन्मान (self esteem) वगैरे. पण सध्यातरी वरच्या चार पायऱ्यांवर लक्ष केंद्रित करतो.

दिवस १७

आजचा विषय - आत्मबोध किंवा स्वची जाणीव (Self awareness)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे 

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

ध्येय २. आत्मबोध हा अथांग सागर आहे. किती वाचू आणि किती नाही हे समजण्याच्या पलिकडे आहे.

तब्येत नरम असल्यामुळे अख्खा दिवस बिछान्यात आहे. अंग आंबुन गेलंय. स्वतः ने केलेली मालिश ही स्वची जाणीव होण्यासाठी चांगली क्रिया आहे असं वाचलं. आणि केली. स्वतःच्या शारिरीक मर्यादा समजतात हे लक्षात आलं.

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे - अतिआत्मविश्वासामुळे जीव गमावलेल्या आयकॅरसची गोष्ट वाचली.

दिवस २७

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪

आजचा विषय - स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

बनवलं.

दररोज एक तास वेळ देणे (त्याउप्पर थोडा वेळ डायरी लिहिण्यासाठी देणार)

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - सराव करणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

हे बोल शोधले.

Carl Jung - “Who looks outside, dreams; who looks inside, awakes.” (जो बाहेर बघतो तो स्वप्नावस्थेत जातो आणि जो आत बघतो तो जागा होतो)

Socrates - “The unexamined life is not worth living.” (न अभ्यासलेलं जीवन जगणे योग्य नाही)

Swami Vivekananda - "Talk to yourself once in a day, otherwise you may miss meeting an intelligent person in this world." (दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला. जगातल्या एका बुद्धिमान व्यक्तीशी संवाद साधायची संधी दवडू नका)

दिवस ३७

Self awareness skill ह्या विषयावरचे मी पाहिलेले हे दोन चित्रपट - Wild Strawberries (1957) and Ship of Theseus (2013)

आजचा विषय (क्र. ०७) स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी दररोज डायरी लिहिणे हे तंत्र सुरू केलं होतं)

आज माझ्या शक्तिस्थानांविषयीचा अभ्यास करणे. Strengthsfinder हे साधन वापरून मी माझी पहिली पाच शक्तिस्थानं पूर्वी शोधली होती. त्यावर आज अभ्यास करतो. 

आज जे काही शिकेन ते रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे

पंधराएक वर्षांपूर्वी आमच्या कंपनीत Strengthsfinder चाचणीपद्धतीने सर्व सिनियर्सची शक्तिस्थाानं शोधली गेली होती. माझी शक्तिस्थाानं ही निघाली - Ideation, Woo, Individualisation, Input, Connectedness.

बऱ्याच वर्षानी त्या चाचणीचा रिपोर्ट वाचला.

त्यावेळी माझा रिपोर्ट पाहून Strengthsfinderच्या एक्सपर्टनं माझ्या साहेबाला सांगितलं की हा लेखक बनू शकेल.

आता लेखकाचं आयटी कंपनीत काय काम असणार? पण माझ्या साहेबानं माझ्यावर जबरदस्ती करून माझ्याकडून पुस्तक लिहून घेतलं आणि ॲमॅझाॅनवर प्रकाशित करवलं.🙏साहेबाला (Sushil Tayal) नमन

दिवस ४७

आजचा विषय (क्र. ०७) स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.

Man’s search for meaning by Viktor Frankl (1946) आणि Mr Ten’s commandments manufacture success and happiness (2022) by Prabodh Sirur

Man’s search for meaning by Viktor Frankl (1946)

लेखकाने नाझींच्या आउश्विट्झ (Auschwitz) कॅंम्पमधे आकाराला आणलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकाची मूळ कल्पना - प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याला काय अर्थ द्यावा ह्या शोधात असतो. एकदा त्याला तो अर्थ गवसला की तो अर्थ त्याला आयुष्य जगायची प्रेरणा देतो. तो मग कुठल्याही परिस्थितीला टक्कर द्यायला मागेपुढे पहात नाही.

त्याला आयुष्याचा अर्थ ह्या तीन स्त्रोतात सापडतो - हेतुपूर्ण (purposeful) काम, प्रेम आणि संकटाला सामोरं जायचं धैर्य.

लेखक लोगोथेरपी ह्या तंत्राचा जनक आहे. मनोरूग्णाना त्यांच्या आयुष्याचा अर्थ शोधायला हे तंत्र वापरतात.

Mr Ten’s commandments manufacture success and happiness (2022) by Prabodh Sirur

लेखक पंचवीस वर्षं आनंद आणि यश म्हणजे नक्की काय ह्याचा अभ्यास/ विचार करत होता. त्यानंतर सुचलेला विचार हा पुस्तकाचा गाभा आहे.

तो म्हणतो की आधी ह्या दोन गोष्टी मी हाताळल्या

१. मी कोण आहे, माझ्या जगण्याचा उद्देश काय, देव कुठे आहे वगैरे प्रश्नांचा विचार हजारो वर्षं मनुष्य करतोय. मी ह्या प्रश्नांचा विचार करणार नाही कारण मी पेशाने तत्वज्ञ नाही

२. जगात एव्हढी दुःखं का आहेत, लोक एकमेकांचा/ इतर प्राणिमात्रांचा छळ/ हाल का करतात, ह्याच्यावर उपाय काय ह्यावर विचार तेव्हाच करेन जेव्हा तो माझ्या जगण्याचा उद्देश असेल.

ही दोन ओझी खांद्यावरून उतरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक दिवस आनंदाच्या आणि यशाच्या क्षणांनी भरलाय. ते कसं उपसायचं ह्याचे उपाय लेखकाने पुस्तकात दिले आहेत.

दिवस ५७

आजचा विषय (क्र. ०७) स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे

पहिलं भाषण -

The Power of Self-Awareness by William L. Sparks

सारांश -

स्वची जाणीव करून घेणं हे आपल्या प्रगतीसाठी फार आवश्यक आहे हे माहित असून आपण त्यासाठी वेळ देत नाही.

जेव्हा आपल्या स्वतःच्या सावलीला सामोरं जाण्याचं धैर्य आपण दाखवतो तेव्हांच आपल्यात परिवर्तन घडतं.

दुसरं भाषण -

Increase your self-awareness with one simple fix by Tasha Eurich

सारांश -

आत्म-जागरूकता म्हणजे स्वतःला स्पष्टपणे पाहण्याची, आपण कोण आहोत, इतर आपल्याला कसे पाहतात आणि आपण जगात कसे बसतो हे समजून घेण्याची क्षमता आहे.

आमच्या संशोधनातून आम्हाला आढळलं की 95% लोकांना वाटतं की ते स्वत:विषयी जागरूक आहेत, परंतु वास्तविक ही संख्या 10 ते 15% च्या जवळ आहे.

माझा ह्या विषयावर एकच सल्ला आहे की हे का झालं ह्यावर विचार न करता पुढे काय पाऊलं उचलायची ह्याची सवय तुम्ही लाऊन घेतली तर तुम्हाला स्वच्या जाणिवेचा खरा फायदा होईल.

तिसरं भाषण -

My stroke of insight by Jill Bolte Taylor

सारांश -

आपल्या मेंदूचे दोन गोलार्ध कश्या प्रकारे विचार करतात हे सांगणारा एक ग्रेट व्हिडियो. TED मधे भाषण कसं करावं ह्याचा एक उत्तम नमुना.

चौथं भाषण -

Should you live for your résumé ... or your eulogy? by David Brooks

सारांश -

हे एक छोटसं पण तुम्हाला आवडेल असं भाषण आहे.

आपण दोन जण आहोत.

एक मी माझे सगळे गुण बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी आहे आणि दुसरा मी माझ्या आतल्या जगाला दाखवण्यासाठी आहे.

पहिला मी माझ्या सामर्थ्यावर बांधला गेला आहे. दुसरा मी माझ्या सगळ्या कमकुवतपणाशी लढा देऊन तयार झाला आहे.

पहिला मी महत्वाकांक्षी आहे. त्याला बाहेरचं जग जिंकायचं आहे. दुसऱ्या मी ला आतलं जग जिंकायचं आहे.

स्वची जाणीव म्हणजे ह्या दोन मीचं द्वंद्व बघणं, दोघांचं संगोपन करणं.

दिवस ६७

आजचा विषय (क्र. ०७) स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

ही ॲप्स शोधली

Thinkladder

हे ऍप् संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) तंत्रांवर आधारित आहे. वापरकर्ते त्यांना इच्छित असलेली थीम निवडतात (उदा. पर्फेक्शनिस्ट, 'माझी इतरांशी तुलना करणे' इत्यादी). त्यानुसार हे ॲप आपल्याला सल्ले देतं.

Inome

हे ॲप आत्म-जागरूकता विकसित करणे, तुम्ही कोण आहात हे शोधणे आणि नवीन सवयी तयार करणे वगैरेसाठी दैनंदिन कार्यक्रम बनवायला मदत करतं.

Intuition Journal

हे ॲप आपल्या अंतर्मनाची दैनंदिनी लिहायला मदत करतं. पण भारतात ते वापरता येत नाही असं त्यांची वेबसाइट सांगते.

CheckingIn

हे वापरायला सुरुवात केली आहे. आपल्या मनात कुठलीही भावना आली की ती ह्या ॲपमधे टाकली की आपल्याला हे ॲप सल्ले देतं, काही व्हिडिओज दाखवतं.

मला वाटतं की हे ॲप coping with emotions ला जास्त योग्य असावं. वापरून बघतो.

दिवस ७७

आजचा विषय (क्र. ०७) स्वची जाणीव (self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

Lane Bryant

“मी जसा/ जशी आहे त्यावर मी खुश आहे” हे एक स्वतःविषयीचं चांगलं मत आहे.

वरच्या वाक्याचा उपयोग करून लेन ब्रायंट कंपनीने एक यूट्यूब जाहिरात बनवली. ह्या जाहिरातीतल्या महिला प्रशस्त देहाच्या आहेत. आपल्या देहाला त्या आनंदाने स्वीकारताना दिसतात.

Dove

आपण आपल्याला नेहमी कमी लेखतो. ह्या मनोवृत्तीवर डव्ह ह्या साबण कंपनीने फार सुंदर ॲड बनवली. त्या ॲडेचा सारांश असा कि आपल्याला स्वतः जितक्या सुंदर वाटतो त्यापेक्षा इतरांना आपण जास्त सुंदर वाटतो.

Don’t buy this jacket

पेटॅगोनिया नावाच्या कंपनीने स्वतःचं विश्लेषण केलं तेव्हां त्यांना जाणवलं की आपण जे जॅकेट्स बनवतो त्याने पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. तेव्हा त्यानी ही जाहिरात बनवली. त्याचा सारांश असा की गरज असेल तरच खरेदी करा.

Farmed and dangerous

चिपोटले ही एक मेक्सिकन पाककृती देणारी कंपनी आहे. त्यांनी स्वतःच्या व्यापारावर विचार करताना त्यांच्या लक्षात आलं की आपण आणि आपल्यासारख्या कंपन्या ज्याप्रकारे जनावरं वाढवतो ते चुकीचं आहे. ह्यावर त्यांनी Farmed and dangerous नावाची वेब सीरीज बनवून समाजाला सावध केलं.

मॅकडॉनल्डची “Our Food. Your Questions.”, कोकाकोलाची “Open Hapiness”, AirBnb ची “Is mankind”, Nike ची “Dream crazier” ह्या जाहिराती स्वतःविषयी सखोल विचार करून बनवल्या गेल्या आहेत.

दिवस ८७

आजचा विषय (क्र. ०७/१०) स्वची जाणीव (Self awareness) 

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

Carl Jung आणि Sigmund Freud

अंतर्मन आपल्याला स्वची जाणीव करून देऊन आपली प्रगती कशी करू शकतो हे ह्या दोन शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं आहे.

Jon Kabat-Zinn: mindfulness-based stress reduction (MBSR) चा शोध ह्याने लावला.

Ira Progoff ने Reflective Journaling चा फायदा पटवून दिला

आपल्या व्यक्तिमत्वाविषयी बरीच तंत्रं शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहेत. ही वापरून आपण कसे आहोत, आपल्या कुठल्या गुणांचं आपण चीज करू शकतो हे आपण अभ्यासू शकतो उदा.

Isabel Briggs Myers चं MBTI (१९४३)

बोलीवियन Oscar Ichazo आणि चिलीचा Claudio Naranjo ह्यांचं Enneagram (१९५०-७०)

Don Clifton चं Strengthsfinder

Aaron Beck चं Cognitive Behavioral Therapy (CBT)

पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -

Brené Brown, Eckhart Tolle, Jiddu Krishnamurti, Ramana Maharshi, Thich Nhat Hanh, Pema Chödrön, Tara Brach

दिवस ९७

आजचा विषय (क्र. ०७/१०) स्वची जाणीव (Self awareness skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - स्वची जाणीव किंवा आत्मावलोकन म्हणजे आत्मनिरीक्षणाद्वारे स्वतःला स्पष्टपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

- आयुष्यात सर्वात जास्त प्राधान्य असलेल्या ५ गोष्टी लिहा

- स्वतःची शक्तिस्थाने आणि कमजोरी लिहून काढा

- प्राधान्य असलेल्या गोष्टी मिळवणे, शक्तिस्थाने अधिक मजबूत करणे आणि कमजोरीवर मात करणे ह्यासाठी ध्येये बनवा

- ह्या ध्येयांवर दररोज लक्ष ठेवून दररोजची प्रगती डायरीत नोंदवा

- दर आठवड्याला प्रगतीचं विश्लेषण करा

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.

प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.

२.१ आत्म-जागरूकतेची तुमची व्याख्या काय आहे आणि वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी ते का महत्त्वाचे आहे?

आत्म-जागरूकता म्हणजे स्वतःचे विचार, भावना, वर्तन आणि त्यांचा स्वतःवर आणि इतरांवर होणारा प्रभाव यांचे ज्ञान.

वैयक्तिक विकासासाठी ह्याचं महत्त्व - आपले विचार आणि कृती ह्यांच्या अवलोकनामुळे आपली वागणूक सुधारते. आपल्या ताकदीचा अंदाज आल्यामुळे आपले निर्णय चांगले होतात. फालतू अहंभाव येत नाही.

२.२ आत्म-जागरूकता आणि आत्म-चिंतन यातील फरक काय?

आत्म-जागरूकता - ह्यामधे अवलोकनावर भर आहे तर आत्म-चिंतनात आपण जे आपल्यात पाहिलं ते सुधारावं कसं ह्यावर केलेला विचार आहे.

२.३ आत्म-जागरूकता विकसित करण्यासाठी काही प्रभावी तंत्रं आहेत का?

(Johari Window model by Joseph Luft and Harrington Ingham, The Enneagram by Oscar Ichazo, The Four Tendencies framework by Gretchen Rubin, StrengthsFinder, DISC Assessment)

२.४ तुम्‍हाला तुमच्‍या आत्म-जागरूकतेमध्‍ये काही तृटी आढळल्या का?

हो. दहाही विषयात मला माझ्यामधे तृटी आढळल्या आहेत. त्याचं कारण असं की मी ह्या विषयातल्या तंत्राचा अभ्यास आणि वापर केला नाही.

२.५ वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण आत्म-जागरूकतेचा वापर कसा करू शकतो? (Mindfulness, Journaling, Self reflection, continuous learning)

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness