Photo credit - UNICEF
अभ्यासक्रम
१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं
२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं
३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं
४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं
५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं
६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं
७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं
८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं
९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं
१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं
सराव (दररोज एक तास वेळ देणे)
पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन
११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे
२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)
४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)
शंभर दिवसांचा प्रवास
दिवस ३
आजचा विषय - सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं.
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा (अरेच्या, समस्या सोडवण्याच्या पद्धतीतसुद्धा हेच आहे?)
नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून अफलातून उपाय शोधणे
तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
ह्या क्षमतेचे फायदे -
प्रत्येक गोष्टीकडे नवीन नजरेने पाहाण्याच्या सवईमुळे आपण चांगले पालक, चांगले शिक्षक, चांगले कर्मचारी बनतो
अख्ख जग सर्जनशीलता वापरायच्या संधींची एक खाण वाटू लागते
नवनवीन क्लृप्त्या सुचत गेल्यामुळे जगायचा जोम वाढतो
पब्लिकमध्ये भाव वाढतो
दिवस १३
सहा विचारी टोप्या (six thinking hats), विश्लेषण साचा (morphological matrix), अहमहमिकेच्या पलिकडे (surpetition), कल्पनेसाठी चालणे (creativity walk) आणि बरंच काही आहे ज्याचा आजच्या सरावासाठी वापर करता येईल.
आजचा विषय - सर्जनशीलतेची क्षमता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
ध्येय २. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
कल्पनेसाठी चालणे (creativity walk) - एखाद्या समस्येवर उपाय शोधायचा असेल, तर बूट घालून फिरायला निघा. जे जे उपाय सुचतील ते मोबाईल वर टिपत जा.
बाहेर पडलो. विचार करायला ही समस्या घेतली - संयुक्त राष्ट्राचं जगातून भूक नष्ट करणे हे एक उद्देश्य आहे (SDG 2 - No Hunger). त्यावर काय उपाय करू शकतो? (तु्म्ही म्हणाल, तू कोण त्यांना सांगणारा? खरंय)
चालताना जे काही रेकॅार्ड केलं ते इथे ठेवलंय -
हे रेकॅार्ड झाल्यावर अजून एक विचार सुचला - प्लॅस्टिकपासून अन्न बनवता येईल का? म्हणजे डबल फायदा.
गंमत म्हणजे हा शोध सध्या चालू आहे.
ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
कलांच्या नऊ ग्रीक देवता ही गोष्ट वाचतोय
दिवस २३
१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪
पहिले दहा दिवस - दहा विषयांच्या व्याख्या आणि पायऱ्या लिहिल्या
नंतरचे दहा दिवस - प्रत्येक विषयातलं एकेक तंत्र वापरून पाहिलं
पुढचे दहा दिवस - प्रत्येक विषयाचं वेळापत्रक बनवायचं
आजचा विषय - सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) एक अफलातून तंत्र काढलंय. त्याला फिनिक्स चेकलिस्ट असं म्हणतात. ३८ प्रश्नांची ही तुलना सारणी वापरून ते कुठलीही समस्या सोडवतात. वाचता वाचता लक्षात आलं की हे सर्जनशीलतेसाठी नसून समस्या सोडवण्यासाठी आहे. त्या विषयाच्या दिवशी ह्याचा विचार करू असं ठरवलं
वेळापत्रक नेहमीसारखेच -
दररोज एक तास वेळ देणे
पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल
११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे
२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)
४१ ते ६० मिनिटं - सराव करणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
हे बोल शोधले.
Dorothy Parker - "Creativity is a wild mind and a disciplined eye." (सर्जनशीलता म्हणजे एक बेभान सुसाट मन आणि एक शिस्तबद्ध डोळा.)
Kurt Vonnegut - "We have to continually be jumping off cliffs and developing our wings on the way down." (सर्जनशीलता म्हणजे सतत कड्यावरून स्वतःला झोकून देण्याचा आणि जमीन येईतोवर पंख उगवावयाचा सराव)
Oscar Wilde - An idea that is not dangerous is unworthy of being called an idea at all. (एखादी कल्पना खतरनाक नसेल तर तिला कल्पना म्हणूच नये)
टीप -
काल म्हटल्याप्रमाणे पॅांडिचरीच्या मदरने लिहिलेला ‘झोप घेत असता सुप्त मनाला काम कसं द्यावं’ हा लेख वाचला. आज वापरून बघतो.
दिवस ३३
Creative thinking ह्या विषयावरचा एखादा चित्रपट माहिती आहे का? पहायला नक्की आवडेल.
मी पाहिलेले हे दोन चित्रपट -
Abstract: The Art of Design (८ भागांची डाॅक्यूसीरीज. ८ सर्जनशील लोकांविषयीचा अभ्यास - नेटफ्लिक्सवर)
The Imitation Game (इंग्रज गणितज्ञ ॲलन ट्यूरिंगच्या आयुष्यावर आधारलेली दुसऱ्या महायुद्धावेळची कहाणी - नेटफ्लिक्स)
आजचा विषय क्र. ०३ सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी Creative walk हे तंत्र वापरून बघितलं होतं)
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे
सर्जनशीलतेचं एक नवीन तंत्र सापडलं - SCAMPER Technique. हे ॲलेक्स आॅस्बोर्न नावाच्या जाहिरात तज्ञाने १९५३ साली शोधून काढलं. आॅस्बोर्न brain storming (मेंदुवादळ/ विचारमंथन) तंत्राचा पिता म्हणून ओळखला जातो.
३३ प्रश्नांची उत्तरं शोधून उत्पादनाचे नवीन प्रकार बनवण्यासाठी हे तंत्र वापरतात.
माझा एक मित्र cloud kitchen/ home kitchen चालवतो. त्याला नवीन कुठले पदार्थ किंवा सेवा देता येतील ह्याचं उत्तर मी SCAMPER Technique वापरून काढलं.
तासभर लागला पण मजा आली. एक कळलं की हे तंत्र एकट्याने बसून केल्यास फार फायदा नाही. बरेच जण हवेत.
दिवस ४३
आजचा विषय (क्र. ०३) सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.
Creativity: Flow and the Psychology of Discovery and Invention by Mihaly Csikszentmihalyi
हे पुस्तक म्हणजे लेखकाने घेतलेल्या १०० ग्रेट लोकांचं सार आहे.
“प्रत्येकजण सर्जनशील असतो” हे मला सगळ्यात आवडलेलं वाक्य😄
दररोज आश्चर्यचकित होणे (उदा. निसर्गातल्या करामती बघून) आणि दररोज एखाद्याला आश्चर्यचकित करणे हा मला ह्या पुस्तकातील आवडलेला विचार
The Medici Effect by Frans Johansson
ह्या पुस्तकाचं सार असं की वेगवेगळ्या फील्डमधले लोक एकत्र येऊन विचार करू लागले तर भन्नाट आयडिया निघतात.
लेखक आपल्या भाषणात हे उदाहरण नेहमी सांगतो - मिक पियर्स नावाच्या वास्तुशास्त्रज्ञाला आफ्रिकेत एक भव्य इमारत बनवण्याचं कंत्राट मिळालं. ह्या कंत्राटातली समस्या ही होती की वातानुकूलकांशिवाय ही इमारत बांधायची होती. त्याने एका वाळवी (termite) शास्त्रज्ञाकडून वाळव्यांच्या वारुळांची माहिती घेऊन त्या आधारे त्याची इमारत बनवली.
आत्ता हे बायोमिमिक्री ह्य विषयावरचं हे सदर वाचतोय. बरीच मजेदार उदाहरणं कळतील -
दिवस ५३
आजचा विषय (क्र. ०३) सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे
पहिलं भाषण - Reinventing creative thinking by Luc de Brabandere, Corporate philosopher
सारांश -
ब्रबांडेरे म्हणतो की चौकटीच्या बाहेर विचार करणे म्हणजे नाविन्य आणि नवीन चौकट तयार करणे म्हणजे सर्जनशीलता आहे. हे पटवायला त्याने बरी उदाहरणं दिली आहेत.
भाषण दुसरं - A smog vacuum cleaner and other magical city designs by Daan Roosegaarde, Innovator
सारांश -
चीनमध्ये रूजगार्दने बऱ्याच ठिकाणी वातावरणातून धूर खेचून घेण्याची यंत्रं लावून वातावरण साफ केलं आणि त्यातून मिळालेल्या कार्बनचे हिरे बनवले.
त्याच्या आयुष्यातल्या अशा बऱ्याच मजेदार कथा त्याने ह्या भाषणात सांगितला आहेत.
तिसरं भाषण - What I learned from 100 days of rejection by Jia Jiang, Author, blogger, entrepreneur
सारांश -
जिया जियांगने सतत १०० दिवस लोकांकडून नकार घेण्याचा प्रयोग केला. ह्या कृत्यामुळे त्याला दोन फायदे मिळाले. पहिला हा की नकार स्वीकारण्याची त्याची भिती गेली आणि नकार घेतल्यानंतर आपण नाविन्यपूर्ण प्रतिसाद कसा द्यायचा ह्याची कला त्याला जमली. मजेदार भाषण.
दिवस ६३
आजचा विषय (क्र. ०३/१०) सर्जनशीलता (creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
ही ॲप्स शोधली
वेगवेगळे प्रश्न/ चित्रं असलेले पत्ते दाखवून आपल्याला विचार करायला लावणारं हे ॲप आहे.
उदा. एखाद्या आव्हानाबद्दल किंवा समस्येबद्दल विचार करा.
मग त्याचा एक प्रश्न बनवा.
नंतर पत्ते पिसून आलेल्या वरच्या पत्त्यावरचा शब्द किंवा चित्र पाहून तुमच्या प्रश्नावर विचार करा.
परत एकदा पत्ते पिसून वरच्या पत्त्यावरच्या चित्रावर किंवा शब्दावरून तुमच्या समस्येविषयी विचार करा.
असं बऱ्याचदा केल्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नावर भरपूर विचार मिळतील.
हे एक मजेदार ॲप आहे.
कल्पना सुचायला आपण बऱ्याचदा एखाद्या वेगळ्या वातावरणाकडे जातो. हे ॲप अश्या वेगळ्या वातावरणाचे आवाज ऐकायला देतं. म्हणजे एखाद्या कॅफेत न जाता तिथल्या आवाजांची अनुभूती ह्या ॲपमुळे मिळते.
यूट्यूबवर असले भरपूर आवाज मिळतील. उदा. Eastern market ambience, Coffitivity,
आपल्याला सुचलेल्या कल्पनेकडे नऊ दिशांनी बघून विश्लेषण करण्याची सुविधा हे ॲप देतं.
मेंदूवादळासाठी (brain storming) आणि मनाचे नकाशे (mind mapping) बनवण्यासाठी भरपूर ॲप्स आहेत. Finance online, Zapier mind mapping
दिवस ७३
आजचा विषय (क्र. ०३/१०) - सृजनशीलता (creative thinking skills)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
Fiskars
जवळ जवळ चारशे वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही फिनलँडची कंपनी, नारंगी रंगाची मूठ असलेली कातर बनवण्यासाठी प्रसिद्ध होती.
त्यांनी सतत सर्जनशीलता आणि नाविन्य स्वीकारून बागकामाची साधने, स्वयंपाकघरातील वस्तू आणि बरेच काही बनवून कात्रीपलिकडे उडी घेतली आहे. वर्षाला सव्वा बिलियन यूरोचा धंदा ही कंपनी करतेय्.
TINE SA
ही सर्वात मोठी नॉर्वेजियन डेअरी उत्पादन सहकारी संस्था आहे. १५,००० शेतकरी ह्या कंपनीचे भागीदार आहेत. १८५६ साली जन्मलेली ही कंपनी मिल्कशेकची जननी मानली जाते.
Swatch
Swatch म्हणजे Second watch. ह्या स्विस कंपनीने जपानी घड्याळ कंपन्यांची मक्तेदारी आपल्या सृजनशीलतेने मोडून काढली. स्टीलऐवजी प्लॅस्टिकचे आवरण वापरणे, रंगीबेरंगी घड्याळं बनवून तरूण पिढीला आकर्षित करणे इ. सृजनशील हतकंडे वापरून ह्या कंपनीने स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. सालाना कमाई ८ बिलियन डॅालर्स
ही एक सिंगापुरची अद्वितीय बाग आहे. दरवर्षी पाच कोटी प्रवासी ही बाग बघायला येतात.
ह्या बागेतली सगळ्यात मजेदार गोष्ट म्हणजे सुपरट्रीज. पंधरा वीस मजल्यांएवढी ही मानवनिर्मित झाडं सौरऊर्जा निर्माण करतात, बागेतली दूषित हवा आकाशात सोडतात, पावसाचं पाणी साठवतात वगैरे वगैरे. हे अतिवृक्ष उभ्या बागा (verticle gardens) बनवायलासुद्धा वापरतात.
DJI
ही चिनी कंपनी जगातले सगळ्यात जास्त ड्रोन्स बनवते. पूर्वी केवळ लष्करी उपयोगासाठी हे भुंगे वापरले जायचे. पण ह्या कंपनीने वेगवेगळी काम करणारे ड्रोन्स बनवले आहेत. उदा. चित्रपटांत आकाशातून फोटो घेणे, मोठमोठ्या शेतात फवारणी करणे, पोहोचायला कठीण अश्या ठिकाणी माल पोहोचवणे, सणासुदीला आकाशात लाखो दिव्यांची रांगोळी काढणे वगैरे
दिवस ८३
आजचा विषय (क्र. ०३/१०) सृजनशीलता (creative thinking skills)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
Temple Grandin
ही स्वतः आॅटिझम् ची रुग्ण होती. त्यावर मात करून ती प्राण्यांच्या वागण्याच्या तऱ्हांची तज्ञ झाली. तिने गाईंचं फार्म कसं असावं ह्यावर बराच अभ्यास करून बऱ्याच कल्पना सुचवल्या आहेत.
Akiro Kurosawa
हा एक जपानी नावाजलेला दिग्दर्शक. त्याने Innovative cinematography ची बरीच तंत्रं शोधून सिनेजगताला योगदान दिलं.
Design thinking हे तंत्र बऱ्याच संशोधकांच्या कार्यांमुळे आज इतकं प्रसिद्ध झालं आहे. महत्वाचं योगदान करणारे लोक म्हणजे - Herbert Simon, Peter Rowe, David Kelley, Tim Brown, Roger Martin.
Osborn and Parnes
ह्यानी Creative problem solving (CPS) ह्या तंत्राचा शोध लावला.
Osborn ने Brainstorming आणि SCAMPER ह्या तंत्रांचासुद्धा शोध लावला आहे.
Walt Disney
आपल्या सर्वांचा बालपणापासूनचा हा मित्र. त्याचे cartoon सिनेमे जगाच्या आयुष्याचा भाग झाले.
गंमत म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या Kansas City Star ह्या वृत्तपत्रातल्या नोकरीवरून त्याला काढून टाकलं होतं. कारण? हा माणूस सृजनशील नाहीये.
नंतर तो सृजनशीलतेचा बादशहा झाला.
Genrich Altshuller
ह्या रशियन संशोधकाने Triz (Theory of inventive problem solving) ह्या तंत्राचा शोध लावला.
पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -
लिओनार्दो, Salvador Dali, Coco Chanel, Zaha Hadid, Ai Weiwei, Jane Goodall, Tim Berners-Lee, Edward De Bono, Tony B
दिवस ९३
आजचा विषय (क्र. ०३/१०) सृजनशीलता (Creative thinking skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
वापरायची पद्धत -
१. प्रॅाब्लेम (समस्या) काय आहे ते व्यवस्थित लिहा
२. नवीन आयडिया शोधण्याच्या बऱ्याच क्लृप्त्या असतात. त्यातली एखादी वापरून उपाय शोधणे
३. तो उपाय वापरायच्या पायऱ्या चार लोकांना समजतील अश्या भाषेत लिहून निर्णय घेणाऱ्याकडे सोपवणे.
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.
प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.
२.१ सर्जनशीलता म्हणजे काय आणि ती इतर प्रकारच्या विचारसरणीपेक्षा कशी वेगळी आहे?
सर्जनशीलता (creative thinking skill) म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याचे नवीन मार्ग शोधण्याची क्षमता
२.२ एखादी व्यक्ती सर्जनशीलता कशी जोपासू शकते आणि सर्जनशील विचारांच्या अडथळ्यांवर मात कशी करू शकते (Keep a creativity journal, Practice brainstorming and idea generation, Embrace curiosity)
२.३ तुम्हाला एखादी समस्या सोडवण्यासाठी सृजनात्मक विचारसरणी वापरावी लागली होती का?
२.४. ह्या विषयातली काही तंत्रं सांगू शकाल का? (Mind mapping, SCAMPER, Random word association, Six thinking hats, Reverse thinking, Forced connections)
२.५ सर्जनशीलता आणि व्यावहारिकतेचा समतोल कसा साधता येईल? (Conduct pilot projects, Embrace a design thinking approach, Develop an implementation plan)
No comments:
Post a Comment