Wednesday, 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०८/१० - सहानुभूती, संवेदनशीलता, हमदर्दी (Empathy)

 

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास 

दिवस ८

आजचा विषय - सहानुभूती, संवेदनशीलता, हमदर्दी (Empathy)

आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

टीपः १९९३ साली जागतिक स्वास्थ्य संघटनेने (World Health Organization) जगभरच्या विद्वानांना बोलावून आयुष्य उत्तमप्रकारे कसं जगावं आणि त्यासाठी कसलं शिक्षण घ्यावं ह्याचा अवहाल बनवायला सांगितला. 

त्या विद्वानांनी दहा विषय निवडले आणि त्या विषयसमूहाला २१व्या शतकाची कौशल्ये असं नाव दिलं. 

WHO आणि UNICEF ने सगळ्या शाळांना हे दहा विषय शाळांमध्ये शिकवावे अशी विनंती केली. 

गेल्या तीस वर्षांत शाळांनी काय केलयं त्याची कल्पना नाही. मला हे सगळे विषय आवडले. ते शिकण्याचा माझा हा प्रयत्न.

आजची प्रगती

व्याख्या - संवेदनशीलता म्हणजे दुसर्‍या व्यक्तीसाठी जीवन कसे आहे याची कल्पना करण्याची क्षमता, अगदी अशा परिस्थितीत ज्याची आपल्याला ओळखही नाही.

हे वाचताना अजून दोन शब्द कळले - sympathy (अनुकंपा) आणि compassion (करुणा).

ह्या तिन्हींमधे काय फरक आहे हे नीट कळलं नाही.

मग म्हटलं मेंदूमधे नक्की काय होतं ते वाचू. थोडं जटिल आहे.

पण वरवर हे कळलं की १९९१ मधे शास्त्रज्ञांनी मेंदूत ‘आरसा तंत्रिकांचा’ (mirror neurons) शोध लावला.

त्या तंत्रिका बोलणाऱ्यांच्या मेंदूतील लहरी, ऐकणाऱ्याच्या मेंदूत निर्माण करून त्यालाही दुःखी करतात.

शास्त्रज्ञांचा शोध चालू आहे.

थोडक्यात काय, दुसऱ्यांच्या भावना समजून घ्यायची ताकद एवढंच लक्षात ठेवतो.

मज्जारज्जू, मज्जातंतू, मज्जासंस्था वगेरेचं आजचं वाचन एवढं मज्जेदार वाटलं नाही.

पायऱ्या (हजार लोकांनी हजार पायऱ्या सांगितल्यायत्. माझ्या मीच ठरवतो झालं)

१. सहानुभूतीचं मुख्य तंत्र म्हणजे समोरच्याला फायदा होईल असा प्रतिसाद देणे. ही गोष्ट नीट लक्षात ठेवणे

२. आपल्याकडे अश्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या समोरच्याला उपयोगी पडतील त्याची नोंद ठेवणे - पैसा, वेळ, माहिती, ओळख, तांत्रिक क्षमता …..

३. दररोज कुठल्या प्रकारे आपण प्रतिसाद देतो ह्यावर बारीक नजर ठेवणे

४. जगात वेगवेगळ्या प्रकारची दुःखं आहेत. ती मला सहन करावी लागली तर मी काय करेन ह्याचा विचार लिहून काढणे

हा एक भला मोठा लेख वाचतोय - Article from Stanford University

दिवस १८

Empathy साठी “पलंगाशेजारचे शिष्टाचार” (bedside manners) हा नवीन शब्द सापडला. त्याचा अभ्यास करतो 

आजचा विषय - सहानुभूती (Empathy)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती
ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढल्या
ध्येय २. ह्यातलं एक तंत्र - “पलंगाशेजारचे शिष्टाचार” (bedside manners) हा सहानुभूती ह्या क्षमतेसाठी उत्तम विचार आहे.
Bedtime manners म्हणजे वैद्याची आपल्या ऋग्णाबरोबरची आदर्श वागणूक.
ऋग्णाला सहानुभूती हवी असते परंतु वैद्याला अलिप्त राहून सेवा द्यायची असते. ही तारेवरची कसरत डॅाक्टर्स अहोरात्र करत असतात.
आता ह्या सदरातल्या गोष्टी थोड्या नाटकी वाटू शकतील
वाचून काढल्या.
एवढं खरं, आपण भेटल्याने ऋग्णाला बरं वाटणार असेल तरच जावं. अन्यथा एखादा सुंदर संदेश पाठवावा. ह्याचाही चांगला परिणाम होतो हे कळलं.
ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे -
शबरीने उष्टावलेली बोरं रामाने प्रेमाने खाल्ली ही गोष्ट वाचली.

दिवस २८
१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪
आजचा विषय - सहानुभूती (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संवेदनशीलता म्हणजे दुसर्‍या व्यक्तीसाठी जीवन कसे आहे याची कल्पना करण्याची क्षमता, अगदी अशा परिस्थितीत ज्याची आपल्याला ओळखही नाही.

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
बनवलं.
दररोज एक तास वेळ देणे (त्याउप्पर थोडा वेळ, जगातल्या वेगवेगळ्या देशातील लोकांच्या वर्तणुकींविषयीचा अभ्यास करण्यासाठी देणार. एक जाडजूड पुस्तक मिळालंय.)
११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे
२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)
४१ ते ६० मिनिटं - सराव करणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
खालील बोल शोधले.
Plato - "Be kind, for everyone you meet is fighting a hard battle." (प्रत्येकाकडे सहानुभूतीने पहा. प्रत्येकजण स्वतःची कठीण लढाई लढतोय.)
Mother Teresa - "If you judge people, you have no time to love them." (लोकांकडे पूर्वग्रहदूषित नजरेनेच बघायला लागलो तर त्यांच्याकडे प्रेमाने कधी बघणार?)
Tahereh Mafi. "All I ever wanted was to reach out and touch another human being, not just with my hands but with my heart." (माझ्या हातांनी नव्हे तर माझ्या हृदयाने दुसर्‍या माणसाला स्पर्श करावा हीच माझी गरज आहे)

दिवस ३८
Empathy ह्या विषयावरचे मी पाहिलेले हे दोन चित्रपट - E.T.: The Extra-Terrestrial (1982) and Bajrangi Bhaijaan (2015)
आजचा विषय (क्र. ०८) सहानुभूती, संवेदनशीलता, हमदर्दी (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे 
दहा दिवसांपूर्वी “पलंगाशेजारचे शिष्टाचार” (bedside manners) हे समजून घेतलं होतं. रोग्यांशी आपण नको ते वायफळ बोलत असतो कारण नक्की काय बोलावं किंवा वागावं ते आपल्याला माहित नसतं. पलंगाशेजारचे शिष्टाचार हा विषय आपल्याला ह्याची जाण करून देतो.
आज काय करायचं ते अजून नक्की नाही. 
आज जे काही शिकेन ते रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
वाचून काढल्या
२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे
एखादी नवीन भाषा आपण शिकलो तर आपली संवेदनशीलता वाढते असं म्हणतात. “तुम्हाला जितक्या भाषा माहीत होतात तितक्या वेळा तुम्ही माणूस होतां” अशी एक झेकोस्लोवाकियाची म्हण आहे.
आज मी ड्यूओ लिंगो नावाचं ॲप वापरून इटालियन भाषेतले बरेच शब्द शिकलो💪
ह्या सदरात छान इटालियन म्हणी दिल्यायत त्या वाचतोय - https://italianpills.com/.../09/italian-sayings-about-life/

दिवस ४८
आजचा विषय (क्र. ०८) सहानुभूती (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.
"The War for Kindness: Building Empathy in a Fractured World" by Jamil Zaki, Professor of Psychlogy, Stanford आणि 'Disguised' by Patricia Moore, President, MooreDesign Associates
सारांश
"The War for Kindness: Building Empathy in a Fractured World" by Jamil Zaki
लेखक म्हणतो दिवसेंदिवस जगातली सहानुभूती कमी कमी होतेय.
सहानुभूती दाखवल्याने देणारा आणि घेणारा ह्या दोघांना लाभ मिळतो. छोट्याश्या प्रयत्नाने प्रत्येकाला जगाची सरासरी सहानुभूती वाढवायची संधी आहे.
आपल्या सहानुभूतीचा/ कनवाळूपणाचा स्नायू कसा मजबूत करावा हे सांगताना लेखकाने एक चांगला शब्द वापरलाय - Empathy Gym (सहानुभूतीची व्यायामशाळा)
Empathy Gym चे व्यायाम -
स्वतःकडे सहानुभूतीने पाहाणे
लोकांना मदत करणे
असहमती चांगल्या पद्धतीने दर्शविणे
कोणी सहानुभूती दाखवताना आढळल्यास त्याला/ तिला प्रोत्साहित करणे
सोशल मिडियावर काॅमेंट टाकताना आपण सहानुभूतीचे कैवारी असल्याचे लक्षात ठेवून काॅमेंट टाकणे
हे सगळं केल्यास आपली मानसिक आणि शारिरीक तब्येत तर चांगली राहीलच. त्याउप्पर जगाची सरासरी सहानुभूती वाढवल्याचा आनंद मिळेल असा लेखकाला विश्वास आहे.
'Disguised' by Patricia Moore
पॅट्रीशिया मूर एक प्राॅडक्ट डिझायनर आहे. कंपनीच्या एका डिसायन मीटिंगमधे तिच्या लक्षात आलं की आपण जे बनवतो ते वयस्कर लोकांना वापरता येतं की नाही हे पडताळत नाही. ही १९७९ ची गोष्ट आहे. लेखिका तेव्हा २९ वर्षांची होती. तिला एक भन्नाट कल्पना सुचली. उद्यापासून म्हातारीच्या वेशात वावरायचं असा तिने निग्रह केला. त्या वेशात तिने तीन वर्षं घालवली. माॅला जाणे, जिने चढणेउतरणे, बसमध्ये चढणे, ट्रेनचा प्रवास करणे, थरथरत्या हातांनी सीलबंद बाटल्या उघडणे, फ्रीज उघडणे वगैरे वगैरे. आणि सगळे अनुभव टिपून ठेवले. ह्या तिच्या संशोधनानंतर empathetic design ह्या संकल्पनेचा उगम झाला.

दिवस ५८
आजचा विषय (क्र. ०८/१०) सहानुभूती (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे
भाषण पहिलं -
सारांश -
हेलनच्या लक्षात आलं की जर डाॅक्टर आणि नर्सेस् ना आपण जर सहानुभूती दाखवायचं प्रशिक्षण दिलं तर रुग्णांचा फार फायदा होईल.
तिने त्या प्रशिक्षणात त्यांच्या लक्षात राहील असं acronym बनवलं. ते असं -
E = Eye contact (बोलताना रूग्णाकडे पाहून बोला)
M = Muscles of facial expression (तुमच्या चेहऱ्याचा प्रत्येक स्नायू रूग्णाला नीट दिसतो हे लक्षात ठेऊन बोला)
P = Posture (आपण ताठ उभं राहून बोलण्यापेक्षा थोडं पुढं वाकून बोलल्यास रूग्णाला आपली सहानुभूती कळते
A = Affect (expressed emotions) (आपल्या भावना कळवताना भान ठेवा)
T = Tone of voice (आवाजातलां मृदु भाव चांगली सहानुभूती निर्माण करतो)
H = Hearing the whole person (रुग्णाचं बोलणं ऐकताना त्याच्या शब्दाबरोबर त्याचे हावभाव, चेहऱ्यावरचे भाव वगैरे सगळं काही नीट बघून घ्या)
Y = Your response (तुमच्या प्रत्येक प्रतिक्रिया विचारपूर्वक द्या)
भाषणातला एक शब्द आवडला - सावुबोना. हा आहे झुलू भाषेतला गुड माॅर्निंग. ह्याचा अर्थ - मी तुला बघतोय (तुझं अस्तित्व माझ्या नजरेनं फार महत्वाचं आहे)
भाषण दुसरं -
The erosion of empathy by Simon Baron Cohen
सारांश -
मनुष्याची सहानुभूती कुठल्या कारणांनी कमी होते ह्याविषयीचं हे भाषण आहे.
अधिकारी व्यक्तीने दिलेल्या आदेशाचं पालन करताना आपली सहानुभूती बाजूला ठेवावी लागते उदा. सैनिकांना शत्रूला मारायची दिलेली आज्ञा
एखाद्या विचारधारेने जाणाऱ्या व्यक्तीची सहानुभूती कमी होते
हे आपले हे आपले नाही हा भाव मनात आला की परक्यांविषयीची सहानुभूती कमी होते
पालकांच्या प्रेमाच्या अभावामुळेसुद्धा सहानुभूती कमी होते (मला प्रेम मिळालं नाही. मी का लोकांना देऊ?)
जगातले संघर्ष कमी करायला सहानुभूती हे एक मोठं/ मौल्यवान
अस्त्र आहे.
हा एक चांगला चॅनल मिळाला - The Art of Empathy by Karla McLaren

दिवस ६८
आजचा विषय (क्र. ०८) सहानुभूती (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
ही ॲप्स शोधली
जगातल्या वेगवेगळ्या प्राण्यांची आणि माणसांची तसंच इतिहासाची ओळख करून देणारं ॲप. मुलांमध्ये सहानुभूती वाढवण्यासाठी फार चांगलं ॲप आहे.
जागो ही एक “सहानुभूति जिम” आहे.
ह्यात वेगवेगळ्या लोकांनी आपले सहानुभूतीविषयक अनुभव सांगितले आहेत. ते बघून आपण ॲपमध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. तसंच आपण आपले अनुभव ॲपमध्ये अपलोड करून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
जगभरच्या भाषा शिकायला हे मस्त ॲप आहे. आपल्या कितीही चुका झाल्या तरी हे बिचारं न रागावता शिकवतं. थोडंसं काही बरोबर शिकलो तर कौतुक करतं.

दिवस ७८
आजचा विषय (क्र. ०८/१०) सहानुभूती (empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
भारत पाक विभाजनामुळे दूर गेलेले मित्र - त्यांची एकमेकांना भेटायची तळमळ ह्या विषयावरची ही जाहिरात
Thai Life Insurance ची ही जाहिरात - सहानुभूती जोपासली की सगळं जग आपलं वाटतं हे पटवून देणारी
Proctor and Gamble च्या Always नावाच्या विभागाची ही जाहिरात - मुली म्हणजे कमकुवत ह्या पुरुषी मनोवृत्तीला फटके देणारी
ह्या जाहिराती म्हणजे Proctor and Gamble ने आयांनी केलेल्या कष्टांना केलेले सॅल्यूट आहेत
Google २०१० पासून Year in search नावाची एक वार्षिक जाहिरात चालवतंय. आपण गूगलला काय प्रश्न विचारतो त्याच्या विश्लेषणानंतर त्यांना काय आढळलं ते सांगणार्या ह्या जाहिराती. आपण सगळ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सहानुभूतीपूर्वक दिलेली प्रतिक्रिया

दिवस ८८
आजचा विषय (क्र. ०८/१०) सहानुभूती (Empathy) 
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
Edwin Rutsch ने The Circle of Empathy चा शोध लावला. ह्या तंत्रात सहानुभूती वापरून कसं ऐकावं, कसं बोलावं हे सांगितलं आहे.
Dave Gray ने The Empathy Map शोधून काढलं. ग्राहकांच्या भावना (feel), विचार (think), तो काय सांगतो (says), तो काय करतो (does) हे विचारात घेऊन आपला प्रॅाडक्ट कसा बनवावा ह्यासाठी Empathy Map वापरतात
Linda Ware ने Empathy Belly चा शोध लावला. गर्भवतीला बाळाचं वजन पोटात घेऊन रोजची कामं करताना काय त्रास होतो ते लोकांना कळावं म्हणून बनवलेला हा पोटाला बांधायचा वजनी पट्टा. बऱ्याच प्रशिक्षणात हा वापरला जातो. उदा. फोर्ड मोटार कंपनीत नोकरीला आलेल्या प्रत्येक इंजिनीयरला प्रशिक्षणाच्या वेळी हा वापरून गाडी चालवायला लावतात.
Simon Baron-Cohen, Alan M. Leslie, आणि Uta Frith ह्यानी Sally–Anne test ह्या चाचणीचा शोध लावला. मुलांमधे autism आहे का ह्याची चाचणी ह्या तंत्राने करतात. सहानुभूतीचा अभाव हे autism चं एक लक्षण आहे.
पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -
Simon Baron-Cohen, Alice Miller, Roman Krznaric, Frans de Waal, Paul Ekman, Helen Riess, Tania Singer

दिवस ९८
आजचा विषय (क्र. ०८/१०) सहानुभूती (Empathy)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.
प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.
२.१ सहानुभूतीची तुमची व्याख्या काय आहे आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांमध्ये ही क्षमता एक महत्त्वाचे कौशल्य का आहे?
सहानुभूती म्हणजे इतर व्यक्ती त्यांच्या संदर्भाच्या चौकटीतून काय अनुभवतात हे समजून घेण्याची किंवा अनुभवण्याची क्षमता. स्वतःला दुसर्‍याच्या स्थानावर ठेवण्याची क्षमता
महत्व - सहानुभूती बाळगल्यामुळे ह्या गोष्टी सहज साध्य होतात - Emotional connection (भावनिक संबंध), effective communication (चांगला प्रभावी संवाद), Conflict resolution (संघर्ष निराकरण), teamwork (एकत्र येऊन काम करण्याची कला), customer satisfaction (ग्राहकांना समाधानकारक सेवा देण्याची कला)
२.२ सहानुभूती (empathy) आणि करुणा (sympathy) यातील फरक काय?
करुणा, दया वगैरे आपल्याला दुःखी करतात. सहानुभूती आपल्याला दुसऱ्याला मदत करायला उद्युक्त करते.
२.३ सहानुभूतीपूर्ण ऐकण्याचा सराव करण्यासाठी काही प्रभावी तंत्रे कोणती आहेत?
सरावाची तंत्रं - Cultural and diversity awareness, Empathy exercises, Empathetic language, Non judgemental Active listening
Some frameworks and models - Affective-Perceptual Model, Mirror Neuron System (MNS) Model, Theory of Mind (ToM) Model, Empathy Circuits Model, Dual-Process Model of Empathy, Empathy-Altruism Hypothesis
२.४ एखाद्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यासाठी आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी तुम्हाला सहानुभूती वापरावी लागली ह्याविषयीच् काही वैयक्तिक अनुभव सांगू शकता का?
बरेच आहेत. विचारपूर्वक लिहावं लागेल.
पण एक कबूल करतो - रस्त्यावर अपघात झालेला बघून त्यांना इस्पितळात घेऊन जाणे, गुंड लोक मुलींना किंवा गरीबांना छेडताना पाहून गुंडांशी दोन हात करायला जी धमक लागते ती माझ्यात सध्यातरी नाही.
२.५ सहानुभूतीची आवश्यकता असलेल्या परिस्थितीत झालेला भावनिक
त्रास (बर्नआउट) टाळण्यासाठी काय धोरणे आहेत? (Practice stress management, Practice emotional detachment, Develop coping strategies, Practice self-compassion and self care)



No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness