Wednesday, 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०४/१० - चिकित्सक विचार करण्याची क्षमता (Critical Thinking skill)

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास    

दिवस ४

आजचा विषय - चिकित्सक विचार करण्याची क्षमता (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

व्याख्या -

चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे. ही महत्वाची पायरी.

प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्याचा पार सॅाक्रेटिसच्या काळापासून किंवा गौतमऋषींच्या काळापासून विचार सुरू आहे. त्यातली एखादी पद्धत वापरून योग्य ते प्रश्न विचारावे.

सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या.

ह्या क्षमतेचे फायदे -

ह्यापुढे प्रत्येक क्षमतेचे फायदे शोधत बसत नाही. ह्या सगळ्या दहा कौशल्यांचे हे फायदे आहेत. तेच पाठ करतो.

१. कुठलाही विचार करताना तो शास्त्रीय पद्धतीने करायची क्षमता वाढून विचारांना एक मजबूत पाया लाभेल

२. मानसिक ताकद वाढून मनावरील हल्ले परतवता येतील

३. समाजात वागायचं कौशल्य प्राप्त होईल

४. लोक आपल्या मार्गदर्शनाने स्वतःचं आयुष्य चांगलं जगू शकतील

५. लोकसेवेने समाधान मिळेल

दिवस १४

ह्यातलं एखादं तंत्र आज वापरणार - पॅाल-एल्डरची चौकट, हॅन्लॅानचा वस्तरा, प्लेटोचं पूर्वग्रह उच्चाटन, सुकरातची प्रश्नावली

आजचा विषय - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

ध्येय २. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

Hanlon’s Razor (ह्याचा अनुवाद मी हॅन्लॅानचा वस्तरा असा केलाय. चूकभूल द्यावी घ्यावी) हे तंत्र वापरायचं ठरवलंय.

हे तंत्र असं आहे - “never attribute to malice that which is adequately explained by stupidity” म्हणजेच “जी कोणी चूक केली आहे ती जाणूनबुजून केली आहे असा शिक्का मारण्याआधी भरपूर उलट तपासणी करा. कदाचित तो मूर्खपणा असेल किंवा अज्ञानामुळे झालं असेल.”

हे ठरवताना साधारणपणे हे प्रश्न विचारावे. सोदाहरण सांगतो -

ती - मोलकरणीला ताबडतोब काढून टाकणार आहे.

तो - ठीक आहे. पण हा निर्णय घेण्यापूर्वी मी थोडे प्रश्न विचारतो. त्याने आपल्याला फायदा होईल.

ती - ओके

तो - मोलकरणीला काढावंसं का वाटतं तुला?

ती - (गूगल केल्यावर जवळ जवळ सहा सात कॅामन कारणं मिळाली. त्यातलंच एक घेतो.)

तो - ती हे जाणून बुजून करते असं तुला का वाटतं?

ती - $#%&€*

तो - तू तिच्याशी ह्याविषयी काय बोललीस? तिचं त्यावरचं म्हणणं तुला कितपत पटलं?

ती - $#%&€*

तो - हे तिचं वागणं चुकीमुळे किंवा अज्ञानामुळे होण्याची शक्यता किती असेल?

ती - $#%&€*

अश्या रितीने हा संवाद पुढे नेल्यास कुठे ना कुठे गंगा जमुनेच्या संगमापर्यंत गाडी जाते.

मुद्दा हा की बऱ्याचदा दुसऱ्यांच्या चुका त्यानी मुद्दाम केल्यायत ह्याच भावनेने आपण वागतो. त्या त्या वेळी आपण हॅनलॅानला आठवलं पाहिजे.

ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

वाचली - सुकरातची प्रश्नावली

दिवस २४

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪

आजचा विषय - चिकित्सकपणा (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

बनवलं

दररोज एक तास वेळ देणे

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - सराव करणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

हे बोल शोधले.

Andy Stanley. "The insecure leader will interpret critical thinking as criticism." (एखादा नेता आपल्या अनुयायांनी काही चिकित्सक प्रश्न विचारल्यास त्या प्रश्नांना टीका समजत असेल तर तो खरा नेता नाही)

Bell Hooks. "Critical thinking involves first discovering the who, what, when, and how of things." (क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात कोण, काय, केव्हा, कसे ह्या प्रश्नांपासूनच होते)

Desmond Tutu - "Don't raise your voice, improve your argument" (आवाज वाढवू नका, युक्तिवाद सुधारा)

टीपः

चिकित्सकपणा ह्या विषयावर आपल्या पुरातन साहित्यात युक्तिवाद, न्यायसूत्र, वाद जल्प वितंड, वादविवादाची खंडन-मंडन पद्धती असं भरपूर लिहून ठेवल आहे.

ग्रीक तत्ववेत्त्यांनी आणि नंतरच्या पाश्चिमात्य विचारवंतांनीसुद्धा ह्या विषयावर बरंच काही लिहून ठेवलंय उदा. चुकीच्या यक्तिवादाच्या (fallacy) शंभर एक पद्धती, गैरसमजाच्या बऱ्याच जाती, पूर्वग्रहाच्या (bias) शंभर एक पद्धती, विरोधाभासाच्या (paradox) जवळ जवळ शंभर जाती वगैरे

भरपूर अभ्यास करावा लागणार आहे.

दिवस ३४

Critical thinking ह्या विषयावरचे चित्रपट मला बघायचे आहेत. तुम्हाला माहित आहेत का?

मी पाहिलेले हे दोन चित्रपट - 

‘गर्ल बॉक्सर' - जेसेलिन सिल्वा या तरुण बॉक्सर मुलीच्या आयुष्यावरची डाॅक्युमेंटरी. ह्यातून शिकण्यासारखं हे की असे चित्रपट मुलांना दाखवून बरेच शिक्षक चिकित्सक प्रश्न विचारतात, जेणेकरून मुलांना critical thinking समजते. 

‘The Boy Who Cried Warming.' - अल गोरसारख्या जागतिक स्तराच्या नेत्याला प्रश्न विचारणारी डाॅक्युमेंटरी. 

आजचा विषय (क्र. ०४) चिकित्सक प्रश्न विचारण्याची कला (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी हॅनलाॅन चा वस्तरा (Hanlon’s razor) हे तंत्र वापरून बघितलं होतं)

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे

चिकित्सक क्षमतेवर एक नवीन तंत्र सापडलं. त्याला Socratic questioning (सुकरातचे प्रश्न) असं म्हणतात.

सुकरात एक ग्रीक तत्ववेत्ता होता (४७०-३९० ख्रिस्तपूर्व)

साॅक्रेटिसचे सहा प्रश्न -

१. काय प्राॅब्लेम आहे? पुरावा काय आहे?

२. हा प्राॅब्लेम का झाला असावा?

३. ह्यामुळे काय काय प्रकारचे परिणाम होतील? जास्तीत जास्त काय होईल?

४. हे परिणाम होतील असं का वाटतं?

५. आणखी कुठले परिणाम होऊ शकतात?

६. तुझा एखादा मित्र ह्या प्राॅब्लेमच्या ठिकाणी असता, तर मी त्याला काय सल्ला द्यावा असं तुला वाटतं?

२८०० वर्षं उलटली. त्यामुळे ह्या प्रश्नांत फेरफार झाला असेल. पण ध्येय असं की दुसऱ्याच्या कल्पनेला फायदा व्हावा.

ह्याचा वापर मी असा केला.

माझ्या एका मित्राला त्याच्या बाॅसने त्यांच्या कंपनीसाठी बढतीची (promotion) एक प्रक्रिया बनवायला सांगितली आहे. त्याला माझी मदत हवी होती. त्याला मी हे प्रश्न शिकवले. सोमवारी तो उत्तरांसह भेटेल. बघू काय करतोय.

दिवस ४४

आजचा विषय (क्र. ०४) चिकित्सक प्रश्न विचारण्याची कला (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.

Weaponized Lies (2016) by Daniel J. Levitin, a Canadian cognitive psychologist.

लेखक म्हणतो की मिडियावर आपण जे वाचतो त्याची शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवतो, म्हणजेच आपण आपली चिकित्सकता वापरत नाही.

त्याने अमेरिकेतली बरीच उदाहरणं दिली आहेत.

ह्या लेखात ह्या पुस्तकाविषयी भरपूर माहिती दिली आहे -

मी वाचलेली सदरं - व्हिएटनाममधला खोटेपणा, इराक युद्धासाठी खोटेपणा, हिटलरचा खोटेपणा

Asking the Right Questions (1981) by Stuart M. Keeley and M. Neil Browne

इराकवर अमेरिकेने हल्ला कसा केला ह्याची ही कहाणी मला पहिल्यांदा कळली -

एका १५ वर्षाच्या मुलीने खोटी माहिती अमेरिकेच्या सरकारला दिली की इराकी सैनिकांनी माझ्यासमोर कुवैती इस्पितळातल्या कित्येक अर्भकांना इन्क्यूबेटरमधून बाहेर काढून जमीनीवर ठेवली. त्यामुळे त्या बाळांचं मरण ओढवलं.

ह्या एका खोट्या वक्तव्याचा बागुलबुवा बनवून अमेरिकेने इराकवर हल्ला चढवला. आणि आणखी एक कारण दिलं की इराककडे जग बुडवणारी शस्त्रे आहेत ज्यामुळे अख्या जगाला धोका आहे.

बऱ्याच वर्षांनी हे अमेरिकेचं कारस्थान बाहेर पडलं. त्यांनीच ही ‘स्टोरी’ घडवली होती. ही घटना आज नायिराह् टेस्टिमनी नावाने प्रसिद्ध आहे. जर सरकारातील काही जणानी चिकित्सक प्रश्न विचारले असते तर दहा वर्षांच युद्ध टळलं असत.

बाकी भरपूर प्रश्न, कारणमिमांसेचे प्रकार वगैरे ह्या पुस्तकात सापडतात.

आकडेवारी (statistics) आणि शास्त्रज्ञांच्या शोधावर कितपत विश्वास ठेवावा हे आता कळेनासं झालंय.

पण एक मला पटलंय की मी चिकित्सक प्रश्न विचारायला लागलो की माझे बरेच मित्र मला सोडून जातील😄

दिवस ५४

आजचा विषय (क्र. ०४) चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे

भाषण पहिलं - Encourage critical thinking with 3 questions by Brian Oshiro, Educator.

सारांश -

पालक किंवा शिक्षक कसे प्रश्न विचारतात त्यावर मुलांच्या चिकित्सक प्रश्न विचारण्याच्या क्षमतेची वाढ अवलंबून असते.

उदा.

हवामान बदल म्हणजे काय? (Do you know what climate change is?)

हवामान बदलाची तीन कारणे कोणती आहेत (What are three causes of climate change?)

हवामान बदल हे या पिढीसमोरील सर्वात मोठे संकट आहे, असा दावा काहीजण का करतात? (Why do some claim that climate change is the biggest crisis facing this generation?)

वरच्या पहिल्या दोन प्रश्नांमुळे मुलांचं ज्ञान जोखता येतं. पण तिसऱ्या प्रश्नांमुळे मुलं चिकित्सक विचार करू लागतात.

पालक आणि शिक्षक ह्यांना अश्या प्रश्नांवर भर देण्याची गरज आहे.

भाषण दुसरं - This is what it's like to go undercover in North Korea by Suki Kim, Author

सारांश -

सुकी किम्, एक गुप्त हेर, उत्तर कोरियामधे २०११ साली एक इंग्रजी शिक्षिका बनून जाते. तिथे तिला त्या देशातल्या भयंकर परिस्थितीचा अंदाज येतो.

पहिलं हे की त्या देशात त्यांचा राष्ट्रपती किम् जॅांग इल् ह्यापलिकडे जगच नव्हतं. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक वर्तमानपत्रातील लेख, प्रत्येक गाणे, प्रत्येक टीव्ही कार्यक्रम, फुलांची नावं वगैरे वगैरे सर्व किम् जॅांग इल् च्या नावाने भरलं होतं. त्यांचं कॅलेंडरसुद्धा किम् जॅांग इल् च्या जन्मदिवसापासून सुरू होतं. प्रत्येक नागरिकाला किम् जॅांग इल् चा बिल्ला लावावा लागतो. हे सगळं आपण का करतो हा प्रश्न कोणी विचारू शकत नव्हतं.

दुसरं हे की तिथल्या मुलांना बाहेरच्या जगावर चर्चा करण्याची परवानगी नव्हती. त्यांना इंटरनेटचं अस्तित्वही माहित नव्हतं.

सुकी किम् च्या लक्षात आलं की मुलांना चिकित्सकपणा, विचार करणं, विचार मांडणं असल्या शिक्षणाची खरी गरज आहे.

सगळ्यात आधी तिने 'खरं की खोटं' ह्या खेळापासून सुरुवात केली. जो देश नागरिकांना फक्त खोटंच सांगतो त्या देशातल्या मुलांना खरं की खोटं हा खेळ नवीनच होता. विचार करायला लावणारा होता. नंतर तिने त्यांना निबंध लिहिणे, घरच्यांना पत्रं लिहिणे वगैरे करायला लावलं. आपल्या निबंधात जे लिहिलं आहे त्यावर पुराव्यानिशी युक्तिवाद कसे करावे हे शिकवलं.

हे भाषण सुकी किम् च्या उत्तर कोरियातल्या दिवसांची कथा आहे.

भाषण तिसरं - Can you outsmart the fallacy that started a witch hunt? by Elizabeth Cox, Educator

सारांश -

सन १९५०. अमेरिकेचा एक सिनेटर जोसेफ मॅककार्थी एक दावा करतो की त्याच्याकडे अमेरिकेतल्या सगळ्या कम्युनिस्ट पुढाऱ्यांची यादी आहे. आणि हे सगळे अमेरिकेची धोरणं ठरवून देश डबघाईला आणतायत. कुठलाही पुरावा न मागता लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. चिकित्सकपणा न वापरल्यामुळे काय नुकसान होते त्यावरचं एक छोटं भाष्य.

भाषण चौथं - Can you outsmart the fallacy that fooled a generation of doctors? by Elizabeth Cox, Educator

सारांश -

सन १८४३. बाळंतपणात ताप येऊन बऱ्याच बायका मरण पावतायत. एका प्रसिद्ध डॅाक्टरच्या म्हणण्यावरच सगळ्यांचा विश्वास. त्याला कोणीही विचारत नाही की दुसरं एखादं कारण असू शकतं का? दुसरा एक डॅाक्टर ॲालिव्हर होम्सच्या असं लक्षात येतं की ह्या बायका दूषित संसर्गामुळे दगावतायत कारण डॅाक्टर्स हात जंतुनाशकाने हात न धुता रोग्यांना तपासतायत. होम्सच्या चिकित्सक वृत्तीमुळे नंतरची मरणं टळतात.

दिवस ६४

आजचा विषय (क्र. ०४/१०) चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता (critical thinking skill)

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
ही ॲप्स शोधली
वादविवादासाठी बनवलेलं हे ॲप आहे.
उदा. जगातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादविवाद
ह्या ॲपचा दुसरा उपयोग म्हणजे विद्यार्थ्यांना वादविवादांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी शिक्षकांना सक्षम करणे
ThinkUp
एक अॅप आहे तुम्हाला दैनंदिन कोचिंग प्रॉम्प्ट पुरवतं. तुमच्या गृहितकांना (assumptions) आव्हान देण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारतं आणि विविध सूचना देतं (आत्ताच्या आवृत्तीत हे ॲप फक्त दररोजचे affirmations चे संदेश देताना दिसतंय)
Questions
विविध विषयांवर गंभीरपणे विचार करण्यास मदत करण्यासाठी
वेगवेगळे प्रश्न विचारणं हे ह्या ॲपचं काम. आणि तेही वेगवेगळ्या विषयांवर उदा. वैयक्तिक वाढ, नातेसंबंध, नीतिमत्ता वगैरे (पण हे डाउनलोड कसं करायचं ही माहिती मिळाली नाही)

दिवस ७४
आजचा विषय (क्र. ०४/१०) - चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता (critical thinking skills)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे - वाचून काढल्या
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
Amazon
"Working Backwards" ही नवीन कल्पना ॲमॅझॅानने विकसित केली आहे. ह्यात एक काल्पनिक प्रेस प्रकाशन आणि FAQ (प्रश्नोत्तरं) प्राॅजेक्ट सुरू झाल्या झाल्या लिहितात. मग चिकित्सक प्रश्न तयार करून त्यांची उत्तरं काढून त्याच्या बरहुकूम तो प्राॅजेक्ट संपवतात.

हा एक चिकित्सकतेचा नमुना आहे. ह्याला व्हॅाटसन ग्लेजर टेस्ट म्हणतात.
Recognize assumptions (काय काय गृहित धरलंय ते आधी लिहा)
Evaluate arguments (युक्तिवाद वापरून गृहितांचं मूल्यांकन करा)
Draw conclusions (निष्कर्ष काढा)

General Electrict
ह्या बलाढ्य १२० वर्षं जुन्या कंपनीने Crotonville ला त्यांच्या लीडर्ससाठी एक प्रशिक्षण केंद्र बनवलं आहे. तिकडे शिकवला जाणारा महत्वाचा विषय म्हणजे चिकित्सकपणा.
Volkswagen
२०१५ साली फोक्सवॅगनला डिझेल उत्सर्जन घोटाळ्यात १५ बिलियन डॅालर्सचा दंड भरावा लागला. लोकांचा कंपनीवरचा भरोसा उडाला.
पुढे काय करायचं हे ठरवायला फोक्सवॅगनने चिकित्सकता वापरून बरेच निर्णय घेतले. उदा. विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी निर्णायक कारवाई करणे, कंपनीचं नेतृत्व बदलणे, नवीन ऊर्जा वापरणाऱ्या (सौर, जैवइंधन) आणि शून्य उत्सर्जनाच्या गाड्या बनवणे वगैरे.
क्रिटिकल सॉफ्टवेअर
क्रिटिकल सॉफ्टवेअर ही पोर्तुगीज कंपनी आहे. त्यांचे यश एरोस्पेस, संरक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या उद्योगांसाठी विश्वसनीय आणि सुरक्षित सॉफ्टवेअर विकसित करणे. ह्या जटिल कामासाठी त्यांचा चिकित्सकतेवर मोठा भर आहे.

दिवस ८४
आजचा विषय (क्र. ०४/१०) चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता (critical thinking skills)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
सॅाक्रेटिस, ॲरिस्टॅाटल आणि रेने देतार्ते ने चिकित्सक प्रश्न विचारण्याच्या कलेचा पाया टाकला आणि डॅनियल काह्नमन सारख्यांनी कळस चढवला.
Argument mapping ह्या तंत्राचा शोध Douglas Walton ह्या तत्ववेत्याने लावला. नंतर बऱ्याच जणानी त्यात भर घातली उदा. Chris Reed, Michael Gilbert, Peter McBurney इत्यादी.
The ladder of inference चा शोध Chris Argyris ने लावला.
The six thinking hats ह्या तंत्राचा शोध Edward De Bono ने लावला
Bloom’s Taxonomy चा शोध Banjamin Bloom ने लावला. चिकित्सक प्रश्न विचारण्याच्या कलेशी ह्याचा थेट संबंध नाही पण शिक्षक हे तंत्र चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता वाढवण्यासाठी करतात.
RED model चा शोध Richard Paul आणि Linda Elder ह्यांनी लावला.
पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -
Ayn Rand, Paulo Freire, Cornel West, Richard Paul, Karl Popper, John Locke

दिवस ९४
आजचा विषय (क्र. ०४/१०) चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता (Critical thinking skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र
आणखी सहा दिवस
आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - चिकित्सकपणा किंवा तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (Critical thinking skill) म्हणजे एखादी माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहानलहान प्रश्नांच्या साह्याने त्या विषयाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची क्षमता

वापरायची पद्धत -

१. ज्या व्यक्तीच्या विचाराची किंवा आयडियाची चिकित्सा करतोय, त्याला आधी समजवा की ही प्रक्रिया त्याच्या विचारातील त्रुटी शोधून तो विचार अधिक परिणामकारक करणे हाच एक हेतू आहे

२. प्रश्न कुठले आणि का विचारावे ह्यावरचं एक तंत्र वापरून योग्य ते प्रश्न विचारावे

३. सगळी उत्तरं मिळाल्यावर त्यानुसार मूळ विचार किंवा मूळ कल्पना बदलून फायनल कराव्या

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.
प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.
२.१ चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता म्हणजे काय आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक संदर्भांमध्ये हा विषय का महत्त्वाचा आहे?
एखाद्या विचारावर असे प्रश्न विचारणे ज्यामुळे तो विचार आणखी चांगला होईल. फायदा हा की असे प्रश्न विचारल्याने आपली विचार करण्याची क्षमता वाढते. लोकांना वाईट न वाटेल हे कसं बोलावं ही कला वाढीस लागते.
आणि विचार सादर करणाऱ्यालासुद्धा फायदा होतो. आपल्या मतावर कोणीतरी विचार केला आहे याचं समाधान होतं. त्याच्या विचारात सुधारणा होते.
२.२ अनुमानात्मक तर्क (deductive reasoning) आणि प्रेरक तर्क (inductive reasoning) ह्यात फरक काय? काही उदाहरणं?
Deductive (moves from general to specific)
Premise 1: All mammals are warm-blooded.
Premise 2: Dogs are mammals.
Conclusion: Therefore, dogs are warm-blooded.
Inductive - (moves from specific to general)
Observation 1: Every cat I have seen so far has a tail.
Observation 2: Every cat my friend has seen has a tail.
Observation 3: Every cat in the neighborhood has a tail.
Conclusion: Therefore, it can be inferred that all cats have tails
२.३ पूर्वग्रह म्हणजे काय?
काही उदाहरणं -
Fallacies (खोटेपणा)
Appeal to Authority Fallacy
False Dichotomy Fallacy
Slippery Slope Fallacy
Straw Man Fallacy
Ad Hominem Fallacy
Biases (पूर्वग्रह)
Confirmation Bias
Availability Bias
Anchoring Bias
Halo Effect
ह्यात भरपूर अभ्यास करायला मिळेल - ग्रीक (म्हणजेच युनानी) तर्कशास्त्र, भारतीय तर्कशास्त्र, चिनी तर्कशास्त्र वगैरे वगैरे
१४ जानेवारी हा जागतिक तर्कशास्त्र दिवस आहे हे आजच समजलं. Kurt Gödel ची पुण्यतिथी आणि Alfred Tarski चा वाढदिवस असा हा दिवस निवडला गेला आहे.
२.४ ह्या विषयाचं एखादं स्वतःचं उदाहरण सांगाल का?
(उदाहरण तयार करावं लागेल)
२.५ ह्या विषयातील काही महत्वाची तंत्रं कुठली आहेत?
Red Team/Devil's Advocate, Socratic Questioning, Neti-Neti, Vada Jalpa and Vitanda, Nyaya and Hetuvidya, Purvapaksha and Uttarapaksha

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness