Wednesday 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०१/१० - निर्णय घेण्याची क्षमता (Decision-making skill)

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास   

दिवस १

बस्स ठरलं. १०० दिवसांचं आव्हान घ्यायचं. 

आजपासून.

१०० दिवसात १० विषयांचा तज्ञ व्हायचं, expert व्हायचं. 

तुम्ही विचाराल, ह्यानं काय होईल? 

मला पण कोडं आहे. उमजेल मला हळूहळू. 

आजचा विषय - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill)

आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र (म्हणजे पुढचे १०० दिवस नम्र. Expert झाल्यावर तेव्हढा नम्र राहाणार नाही कदाचित )

आजची प्रगती

व्याख्या - निर्णय घेणं म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचणं.

निर्णय घेणं म्हणजे पद्धतशीरपणे निर्णय घेणं? हे काय? ही कसली व्याख्या?

वाचून जरा कन्फ्युज झालो. पण वापरायची पद्धत वाचल्यावर कळलं.

वापरायची पद्धत -

प्रॅाब्लेम (समस्या) काय ते आधी लिहा. नीट लिहा. कन्फ्युजन नको.

कुणाकुणाला ह्याचा त्रास होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा. नंतर लफडी नकोत

ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते उतरवून काढा. खाजवा डोकी

प्रत्येक उपायाचे फायदे तोटे लिहा

कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा (हे काय, कोणीही सांगेल)

हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

हे वरचं सगळं, सगळ्या त्रासलेल्यांना (stakeholders) कळवा म्हणजे झालं.

ह्या पद्धतीचे फायदे?

आहेत की.

पहिला हा की प्रत्येक त्रासलेल्याची कदर केल्याचं समाधान

एक व्यवस्थित शास्त्रीय पद्धत वापरल्यामुळे बऱ्याच लोकांची तोंड बंद पडतील

निर्णयाचा आदर होईल

आणि प्लॅन वगैरे केल्यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात कधी उतरेल ते सगळ्यांना कळेल.

हे सगळं लिहिताना घाम फुटला बाबा. हे सगळं १०० दिवस करणं हे मोठं दिव्य असणार आहे.

कुठून ही दुर्बुद्धी सुचली! 

दिवस ११

गेम थियरी कोळून पिणार?

आजचा विषय - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

व्याख्या आणि पद्धत पाच वेळा वाचली.

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६ हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

ध्येय दोन - ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

गेम थियरीचा आज मास्टर होणार होतो. पण हे जरा मोठं प्रकरण आहे. पाहू पुढे.

त्याऐवजी निर्णयवृक्ष (decision tree) ह्या तंत्राचा अभ्यास करायचं ठरवलं.

निर्णयवृक्ष (decision tree) तंत्र हल्ली कृत्रिम अकलेत (artificial intelligence) वापरतात असं कळलं. पूर्वी संख्याशास्त्रात (statistics) वापरत.

पण मला वाटतं की फार पूर्वीपासून आपण हे वापरत असणार. उदा. अर्जुनाने “मी भावांना मारणार नाही” हा निर्णय जेव्हा घेतला असेल तेव्हां नक्कीच ह्या तंत्राचा वापर केला असेल.

हे तंत्र काय आहे ते सांगतो म्हणजे तुम्हाला पटेल.

ह्या तंत्रात तीन चिन्हांचा वापर करतात - मूळ प्रश्न लिहायचा चौकोन (root node), वेगवेगळे अॅाप्शन्स (पर्याय) लिहायला फांद्या आणि हो किंवा नाही हे लिहायला पानं. जोपर्यंत उत्तरं मिळतायत तोवर फांद्या आणि पानं काढत रहायचं, फायनल उत्तर मिळेपर्यंत.

हे एक उदाहरण घेऊन decision tree चा वापर करतो -

मूल पेर (Root node) - हेमंताला “हो” म्हणू का?

फांद्या - कमावतो का, शिकलाय किती, भावंडं किती, राहातो कुठे, वेज की नॅानवेज, भारतात आहे की बाहेर, आई जिवंत आहे की नाही वगैरे वगैरे

एक फांदी विस्तारून पाहातो - मुलगा (हेमंत) भारतात आहे की बाहेर?

पानं - भारताबाहेर —> दुबईला की यूएस्

मुलीला यूएस् हे उत्तर हे हवं असेल आणि हेमंता यूएस् ला असेल तर पानं वाढत राहातील उदा. यूएस् ला कुठे वगैरे

पण हेमंता दुबईला असेल तर ही फांदी थांबली.

आणि हेमंतचा पत्ता कट झाला.

ध्येय तीन - ह्या विषयावरची एक गोष्ट वाचणे

ग्रीक साहित्यातली गोष्ट वाचली - सर्वात सुंदर कोण ह्यावर पॅरीसने काय निर्णय दिला?

दिवस २१

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 

पहिले दहा दिवस - दहा विषयांच्या व्याख्या आणि पायऱ्या लिहिल्या

नंतरचे दहा दिवस - प्रत्येक विषयातलं एकेक तंत्र वापरून पाहिलं

पुढचे दहा दिवस - प्रत्येक विषयाचं वेळापत्रक बनवायचं

आजचा विषय - निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

दररोज एक तास वेळ देणे

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

Mark Twain - “Good decisions come from experience. Experience comes from making bad decisions.” (अनुभवातून चांगले निर्णय घेतले जातात. वाईट निर्णय घेतल्याने अनुभव येतो. अर्थात, चुकीचे निर्णय घ्यायची सवय ठेवा)

Richard Paul Evans - “The most important story we'll ever write in life is our own-not with ink, but with our daily choices.” (जीवनातील सर्वात महत्त्वाची कथा ही आपली स्वतःचीच - आपण घेतलेल्या रोजच्या निर्णयांच सार)

Robert Greenleaf - “One rarely has 100% of the information needed for a good decision no matter how much one spends or how long one waits.” (कितीही वेळ किंवा श्रम खर्च केले तरी एखाद्या चांगल्या निर्णयासाठी आवश्यक असलेली १००% माहिती क्वचितच मिळते. अर्थात, बरेच निर्णय अपुर्‍या माहितीवरच घ्यावे लागतात)

दिवस ३१

Decision making ह्या विषयावरचा एखादा चित्रपट माहिती आहे का? पहायला नक्की आवडेल. 12 Angry men (1957) and Sully (2016) हे दोन मी पाहिले आहेत. 

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 

आजचा विषय क्र. ०१ निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी decision tree हे तंत्र वापरून बघितलं होतं)

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी decision tree हे तंत्र वापरून बघितलं होतं)

आज मी एडवर्ड डिबोनोच्या DOCA तंत्राचा उपयोग करणार होतो.

पण gut feel/ intuition (अंतर्ज्ञान) वापरून निर्णय कसा घ्यावा ह्यावर गजब माहिती मिळाली. गाडी ह्या विषयावर वळवली.

आता अंतर्ज्ञान हे शास्त्र आहे की अंधविश्वास आहे हे कळलं नाहीये.

माझ्या एका भाचीने तिच्या मुलीला आर्ट आॅफ लिव्हिंगच्या अंतर्ज्ञानाची ताकद कशी वाढवावी ह्याच्या शिकवणीला पाठवल्याचं आठवलं. तिला विचारलंय की हे कसं करतात. तिच्याकडून बरीच माहिती कळेल.

मेंदूच्या थीटा आणि डेल्टा तरंगांविषयी वाचतोय. ते निर्णय घ्यायला काय मदत करतात ते समजून घेतो.

एकूण काय, निर्णय घेण्याचं कुठलं तंत्र आज वापरायचं ह्याचा निर्णय काही झाला नाही 

दिवस ४१

आजचा विषय (क्र. ०१) निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

ह्या दोन पुस्तकांचा सारांश - Predictably Irrational: The Hidden Forces That Shape Our Decisions

लेखक - डॅन आराइली

सारांश - आपले बहुतेक निर्णय तर्कबद्ध नसतात. आणि बऱ्याचदा आपण एकाच पॅटर्नने/ साच्यात निर्णय घेत असतो.

निर्णय घ्यायची वेळ आली की पहिली गोष्ट ही करा की निर्णय घ्यायची डेडलाईन ठरवा. लांबवत ठेऊ नका.

दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक घेतलेल्या निर्णयाची माहिती लिहून ठेवत जा. म्हणजे तुमचा पॅटर्न तुम्हाला उमजेल. ह्या अभ्यासाचा पुढच्या निर्णयाच्या वेळी उपयोग होईल.

दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे ‘The decision book’ लेखक - Mikael Krogerus आणि Roman Tschäppeler.

ह्या लेखकांनी निर्णय घेण्याचे पन्नास प्रकार (models) सांगितले आहेत. त्यातली १७, स्वतःला ओळखण्याविषयी आहेत, १५ दुसऱ्याला जाणून घेणे, १३ स्वतःला सुधारणे आणि ५ दुसऱ्याला सुधारणे अश्या चार समुहात मोडतात.

दिवस ५१

आजचा विषय (क्र. ०१) निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे

पहिलं भाषण - Would you sacrifice one person to save five? by Eleanor Nelsen, Educator

सारांश

अशी कल्पना करा की तुम्ही एक ट्रॉली रुळांवरून पाच कामगारांच्या दिशेने जाताना पाहत आहात. तुम्ही अशा स्विचच्या शेजारी उभे आहात जे ट्रॉलीला दुसऱ्या ट्रॅकवर वळवू शकतं. तुम्ही स्विच दाबला नाही तर ते पाचही कामगार मरणार. पण इकडे एक प्राॅब्लेम आहे. दुसऱ्या रुळावर एक कामगार काम करतोय. त्यामुळे जर तुम्ही स्विच दाबला तर हा मरेल.

तर तुमचा निर्णय काय असेल? पाच मारायचे का एक?

एलेनॉर नेल्सनने ट्रॉलीची समस्या असलेल्या नैतिक कोंडीचा तपशील दिला आहे.

दुसरं भाषण - How to make choosing easier by Sheena Iyengar, Psycho-economist

सारांश

आपण खरेदीला जातो तेव्हा जर आपल्याला एकाच पदार्थाचे फार जास्त प्रकार दाखवले तर आपण गोंधळून जातो. नक्की काय घ्यायचं ह्याचा निर्णय घेऊ शकत नाही.

शीना अय्यंगार ही आपल्या वेगवेगळ्या संशोधनाद्वारे समजलेले सल्ले देते - कमी प्रकार ग्राहकांसमोर ठेवा, चित्रं/ व्हिडियोचा वापर जास्त करा, सगळ्या वस्तू एकदम न दाखवता त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करून दाखवा वगैरे

भाषण तिसरं - The paradox of value by Akshita Agarwal, Educator

सारांश

कल्पना करा की तुम्ही गेम शोमध्ये आहात आणि तुम्ही दोन बक्षिसे निवडू शकता: एक हिरा किंवा पाण्याची बाटली. निवड सोपी आहे – तुम्ही हिराच निवडणार.

पण दिवसभर वाळवंटात चालून तहानलेले असताना तुम्हाला हाच प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर ‘पाणी’ हे असेल.

पहिल्या परिस्थितीत हिरा मौल्यवान होता आणि दुसऱ्या परिस्थितीत पाणी मौल्यवान.

आपल्याला आयुष्यातला विरोधाभास दाखवणारं हे भाषण.

भाषण चौथं - 3 ways to make better decisions -- by thinking like a computer by Tom Griffiths, Professor, Princeton University.

सारांश

टाॅम ग्रिफिथ सांगतात की आपण निर्णय घेताना संगणक जसे निर्णय घेतो तसे घ्यायला शिकलं पाहिजे.

काही मजेदार उदाहरणं -

आज रात्री कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं ते निवडण्यासाठी तुम्ही ‘Explore Exploit Tradeoff’ ही संगणकाची पद्धत वापरा.

तुम्हाला एखाद्या नवीन रेस्टाॅरंटला जायचंय (explore) की पूर्वी जिथे गेलाय तिकडे जायचंय (exploit) ह्याचं आधी उत्तर काढा. नंतर पुढच्या गोष्टीला हाच प्रश्न विचारा. नवीन काही खायचंय की मागच्या वेळी खाल्लं तेच. आपोआप निर्णय मिळेल.

दुसऱ्या पद्धतीचं नाव आहे ३७% रूल किंवा सेक्रेटरी प्राॅब्लेम. समजा तुम्हाला सेक्रेटरी निवडायचं आहे. तर आधी काही मुलाखती घ्या. त्यातली सर्वात चांगली व्यक्ती निवडा. मग उरलेल्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात करा. जी पहिली व्यक्ती ह्या निवडलेल्यापेक्षा चांगली भेटली की तिची निवड करा. उरलेल्यांची मुलाखत घेऊन वेळ वाया घालवू नका. हे तंत्र १८व्या शतकातला प्रसिद्ध गणिती बर्नौली ह्याने शोधून काढलंय.

आता फार वाढवत नाही. टाॅमचं भाषण ऐका.

दिवस ६१

आजचा विषय (क्र. ०१/१०) निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

ही ॲप्स शोधली

Random Decision Maker (Android) / Tiny Decisions (iOS)

अगदी क्षुल्लक निर्णय घेण्यासाठी हे ॲप चांगलं आहे. नाणं उडवून आपण छापा काटा करून जसा निर्णय घेतो तसलंच हे ॲप आहे

Choice compass

हे एक मजेदार ॲप आहे. तु्म्ही पर्याय निवडल्यावर तुमच्या ह्रदयाचे ठोके मोजून तुमचा कुठला पर्याय चांगला आहे हे आपल्याला ह्या ॲपमधून कळतं.

Protagonist: Decision making (iOS)

हे निर्णय घेणारं अॅप प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूलसारखं दिसतं. टीममध्ये एकत्र येवून निर्णय घेण्यासाठी हे ॲप आहे (उदा. एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवणे किंवा कार खरेदी करणे)

दिवस ७१

आजचा विषय (क्र. ०१/१०) - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skills)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजवर दहा विषयांचा हा अभ्यास केला - 

Day 1-10 - दहा विषयांच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणांमुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

Day 11-20 - दहा विषयांतले एक एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयांवरची एखादी गोष्ट वाचणे

Day 21-30 - दहा विषयांचे वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयांवरील थोरांचे बोल शोधणे

Day 31-40 - दहा विषयांवरचे नवीन तंत्र वापरून बघणे आणि सिनेमे बघणे

Day 41-50 - दहा विषयांच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

Day 51-60 - दहा विषयांच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

Day 61-70 - दहा विषयांवरील mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

१. IKEA ची फर्निचर संकल्पना

IKEAने निर्णय घेतला की ग्राहकाला तयार फर्निचरपेक्षा त्याचे भाग देऊन जुळवाजुळव करायला सांगूया.

ह्या निर्णयामुळे त्यांचा उत्पादनखर्च कमी झाला, नाविन्यामुळे लोकप्रिय होऊन धंदा वाढला.

ह्या त्यांच्या निर्णयाने उद्योगात क्रांती घडवून आणली.

IKEA हे नाव म्हणजे संस्थापकाच्या नावाची (Ingvar Kamprad) आद्याक्षरं - IK, ज्या शेतात वाढला (Elmtaryd)

त्याचं आद्याक्षर E आणि जवळच्या गावाचं (Agunnaryd) आद्याक्षर A ह्यांवरून ठेवलंय.

आज त्यांचा वार्षिक धंदा (revenue) ४२ बिलियन डॅालर्स आहे आणि दोन लाखापेक्षा जास्त लोक इथे कामाला आहेत.

हे वाचताना आयकिया इफेक्ट हे नवीन प्रकरण समजलं.

आपण विकत घेतलेल्या वस्तुपेक्षा स्वतःने बनवलेल्या वस्तूला जास्त किंमत देतो. ह्या आपल्या भावनेला आयकिया इफेक्ट असं नाव पडलंय.

२. Nordstrom

हे एक १२२ वर्षं जुनं अमेरिकेतलं सुपरमार्केट आहे.

त्यानी एक निर्णय घेतला की ग्राहकांना जर एखादी वस्तू परत करायची असेल तर आपण ती विनाशर्त परत घ्यायची.

ह्या एका निर्णयाने त्यांची प्रसिद्धी झाली.

आज त्यांच्या पाच एकशे दुकानात ६२,००० लोक काम करतात. २०२१मधे त्यांचा धंदा (revenue) १ लाख २३ हजार कोटी रुपयांचा (15 billion dollars) होता.

३. Toyota

१९६१ मध्ये टोयोटाने अमेरिकन बाजारातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. पांच वर्षं करोडोंचा खर्च फक्त गाड्यांची गुणवत्ता (quality) वाढवण्यासाठी करायचं ठरवलं. ह्यामुळे त्यांना भरघोस यश मिळालं.

आज टोयोटामध्ये ४ लाख लोक काम करतात. त्यांचा धंदा २०२१ मध्ये २५७ बिलियन डाॅलर्स होता (किती रुपये ते लिहीत नाही. बराच मोठा आकडा आहे)

४. Ford motors

ही १०८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फोर्ड कंपनीत १९१३ मध्ये असेंब्ली लाईन वापरून गाड्या बनवायची सुरुवात झाली. पण त्यामुळे लोकांना ते काम अगदी यांत्रिक झाल्यामुळे भराभरा लोक ती कंपनी सोडू लागले. कंपनीचा मालक हेन्री फोर्डने निर्णय घेतला की लोकांना डबल पगार द्यायचा. एका रात्रीत लोकांच्या पगारात १०० टक्के वाढ झालेली पाहून लोक परतायला लागले. अश्या रितीने फोर्डचं टी माॅडेल यशस्वी झालं.

५. Microsoft

IBM एक जबरदस्त मोठी कंपनी. त्यावेळी Microsoft एक बच्चा कंपनी होती. IBM ला Microsoft ची सिस्टिम (MS DOS operating system) हवी होती. ते वाटेल ते पैसे द्यायला तयार होते. पण Microsoft ने सिस्टिम न विकता फक्त वापरायचं लायसन द्यायचा निर्णय घेतला. सुरुवातीला भक्कम पैसे मिळाले नाहीत. पण जसजशी संगणकांची विक्री होत गेली तसं तसे त्यांना पैसे मिळत देले. बाकीच्या सर्व संगणक निर्मात्यांना त्यांना ही सिस्टिम विकता आली.

ह्या एका निर्णयाने Microsoft चं भाग्य बदललं.

आज त्यांचा वार्षिक धंदा २०० बिलियन डॅालर्स आहे. सव्वा दोन लाख लोक इथं काम करतात.

दिवस ८१

आजचा विषय (क्र. ०१/१०) निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skills)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

Daniel Kahneman: काह्नेमनला २००२ साली behavioural economics ह्या त्याच्या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. प्रॅास्पेक्ट सिद्धांतासाठी तो प्रसिद्ध आहे. ॲमॅासने त्याच्याबरोबर अनिश्चित वातावरणात निर्णय कसे घ्यावे तसंच पूर्वग्रह ह्यावर काम केलं आहे.

Herbert Simon: हा १९७८ चा नोबेल पुरस्कार विजेता आहे. त्याचा मुख्य विषय म्हणजे बंधनकारक तर्कशुद्धता (bounded rationality) आणि समाधानाची संकल्पना(concept of satisficing)

John von Neumann: संगणक क्षेत्रातला शास्त्रज्ञ, गणितातला तज्ञ, अमेरिकेच्या अणुशास्त्र सभेचा सभासद अशा आणि इतर सतराशे विषयात पारंगत असा हा इसम. निर्णय सिद्धांत आणि game theory मधे त्याने भरपूर काम केलं आहे.

Peter Drucker: ह्याला व्यवस्थापन (management) ह्या विषयाचा पितामह समजलं जातं. कंपन्यांमध्ये निर्णय कसे घ्यावे ह्यावर त्याने खूप काम केलं आहे.

Gary Klein: अंतर्मनाचा निर्णय घेतानाचा सिंहाचा वाटा ह्या विषयाचा हा गुरू आहे

पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली ही बरीच नावं -

Howard Raiffa, Max Bazerman, Ruth Bader Ginsburg, Edward Thorndike, Anna Wierzbicka, Amartya Sen, Esther Duflo इ.

दिवस ९१

आजचा विषय (क्र. ०१/१०) निर्णय घेण्याची क्षमता (decision-making skills)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - निर्णय घेण्याची क्षमता (decision making skill) म्हणजे पद्धतशीरपणे एका निर्णयापर्यंत पोहोचण्याची क्षमता. एखादं तंत्र (technique/ model/ formula) वापरून निर्णय घेण्याची क्षमता.

वापरायची पद्धत -

१. प्रॅाब्लेम (समस्या) काय ते लिहा.

२. आपल्या निर्णयामुळे ज्याला फायदा किंवा तोटा होतोय (stakeholders) त्यांची यादी बनवा

३. ही समस्या सोडवायला जितके काही उपाय सुचतील ते फायदा तोट्यासह उतरवून काढा

४. कमीत कमी तोट्याचा आणि जास्तीत जास्त फायद्याचा उपाय निवडा

५. हा उपाय कसा अंगिकारायचा त्याची योजना (plan) बनवा म्हणजे कोणी, काय, केव्हां करायचं ते कळेल

६. हे वरचं सगळं, सगळ्या stakeholdersनां कळवा.

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.

प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे लिहीत नाही.

२.१ निर्णय घेताना लोक कोणत्या प्रकारच्या चुका करतात आणि त्या कशा टाळता येतील? (सगळ्या पूर्वग्रहांचा अभ्यास उपयोगी पडेल) (Some common mistakes

Confirmation Bias, Anchoring Bias, Overconfidence, Emotional Decision-making, Sunk Cost Fallacy, Groupthink, Lack of Decision Analysis, Failure to Learn from Past Decisions)

२.२ अल्प-मुदतीची आणि दीर्घकालीन उद्दिष्टे यांचा समतोल राखून निर्णय कसा घ्यावा? (आपली उद्दिष्टे आणि आपली मूल्ये लिहून ठेवलेली बरी. त्याचा चांगला उपयोग होईल)

२.३ तुम्हाला कधी एखादा कठोर निर्णय घ्यावा लागला होता का? त्याविषयी काही सांगू शकाल का? (खरं सांगायचं तर माझे पूर्वीचे निर्णय बऱ्याच वेळा दुसऱ्यांनी घेतले किंवा मी दुसऱ्यांना वाईट वाटेल म्हणून घेतले, म्हणजेच भावनांच्या आहारी जाऊन घेतले आहेत)

२.४ निर्णय घेताना भावना प्रभाव टाकतात का? किंवा अंतर्मन आपल्याला काही मदत करतं का? (अंतर्मनाविषयी जास्त अभ्यासावं लागेल)

२.५ वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये निर्णय घेताना एकच तंत्र आपण वापरू शकतो की वेगवेगळी वापरावी लागतात? (तंत्रं वापरायची तालीम, हेच ह्याचं उत्तर)

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness