Wednesday 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०६/१० - भावनिक संपर्क क्षमता (Interpersonal skill)

 Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास   

दिवस ६

आजचा विषय - Interpersonal skill. ह्या विषयाचं ‘व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबध’ असं मोठं भाषांतर आहे. थोडं बोजड वाटतंय. त्याऐवजी, ‘संपर्क फुलवण्याची कला’ असं म्हणायचं ठरवतोय. 

आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं. आणि अवलंबण्याच्या पायऱ्या समजून घेणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

आज हा सगळा अभ्यास केल्यावर वाटलं की मी दिलेलं नाव (भावनिक संपर्क क्षमता) बरोबर नाही. शोधू नंतर.

दिवस १६

ह्यातलं एखादं तंत्र आज वापरणार - मानसशास्त्रज्ञ एरिक बर्नने खेळकर आणि अखेळकर अशा छत्तीस संभाषणक्रीडा बनवल्या आहेत (Games people play). त्यातलं काहीतरी खेळून बघतो. 

आजचा विषय - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे 

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

ध्येय २. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेतलं - मानसशास्त्रज्ञ एरिक बर्नने शोधून काढलेल्या ३६ पैकी १० खेळ वाचले. त्यातला “Why don’t you…… Yes but” (तू का नाही ….? हो पण….) ह्या खेळाचं सार समजून घेतलं.

सांगतो थोडक्यात -

हे खेळ, खेळ नसून कावा असतात. उदा. “Why don’t you…… Yes but” ह्या खेळात सांगणाऱ्याला उत्तर नको असतं. त्यामुळे आपण कितीही उपाय सुचवले (हे का करत नाहीस?) तरी तो “हो, पण” असं म्हणून आपलं उत्तर खोडत राहातो. बऱ्याच वेळाने त्याचा कावा समजल्यावर आपण गप्प राहातो. आपण गप्प राहिलो की हा खेळ संपतो. आणि विचारणारा आपल्या मूळ मनस्थितीत म्हणजे कावलेल्या स्थितीत जातो.

ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

कृष्णाने युद्ध होऊ नये म्हणून बऱ्याच वाटाघाट्या केल्या. त्याच्या शैलीचं मस्त वर्णन ह्या लेखात दिलं आहे. हा लेख वाचला - Lord Krishna – Role model of an effective negotiator.

दिवस २६

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪

आजचा विषय - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

वेळ मिळाल्यास थॅामस-किल्मन मॅाडेलचा अभ्यास करणे

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

बनवलं.

दररोज एक तास वेळ देणे (त्याउप्पर थोडा वेळ कौटुंबिक संघर्षांवर - conflicts with spouse or other family members चर्चा करण्यात घालवायचा विचार करतोय. हे मला फार महत्वाचं वाटतंय)

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - सराव करणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

हे बोल शोधले.

Eleanor Roosevelt - "To handle yourself, use your head. To handle others, use your heart." (स्वत: ला हाताळण्यासाठी, आपले डोके वापरा. इतरांना हाताळण्यासाठी, आपले हृदय वापरा.)

J. F. Kennedy. "We cannot negotiate with people who say what's mine is mine and what's yours is negotiable." (जे माझं आहे ते माझं आहे आणि जे तुझं आहे ते मला हवंय. अश्या माणसाबरोबर वाटाघाटी करण्यात अर्थ नाही.)

Paulo Coelho. "When you say yes to others, make sure you are not saying no to yourself." (जेव्हा तुम्ही इतरांना हो म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःला नाही म्हणत नसल्याची खात्री करा.)

दिवस ३६

Interpersonal skill ह्या विषयावरचे चित्रपट मला बघायचे आहेत. तुम्हाला माहित आहेत का?

मी पाहिलेले हे दोन चित्रपट - 

The Godfather (1972) आणि Living Aikido Life (2017

आजचा विषय (क्र. ०६) भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी conflict management ह्याचं तंत्र वापरून बघितलं होतं)

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे.

Influence (प्रभाव पाडणे) ह्या विषयीचे व्हिडियो पाहिले.

आपल्या खाली काम करणाऱ्या एका शासकीय अधिकार्याशी अद्वातद्वा बोलणार्या एका MLA ला ही मेल पाठवली

Quote

Dear xxx,

You are a role model and an inspiration to millions of people.

As an elder and a student of life skills, I am sending a few suggestions to you after watching your video just now.

1. You are reprimanding someone in public. The role model behaviour is to reprimand in private

2. Instead of saying blacklist the contractor, you could have used some problem solving technique to find why shoddy work was done. This would have created a live lesson to your thousands of students.

3. You had an opportunity to influence the contractor, your pwd employee and to inspire the world watching the video. For example, by telling the pwd guy - You, the contractor and I are on a mission to create a landmark for the world. We are using people’s money for this ….. etc., you would have really helped generate the right ethos, pathos, logos. An opportunity to demonstrate how the leaders influence!

I am sure my suggestions will help you become an inspirational leader. And an example to all.

Unquote

दिवस ४६

आजचा विषय (क्र. ०६) भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.

Influence without authority (2010) आणि Compelling people (2013)

Influence without authority (2010) by Allan R. Cohen and David L. Bradford, professors at Babson and Stanford respectively

आपल्याला आयुष्यात बऱ्याच वेळा नेतृत्व करावं लागतं. आपल्याला कोणी तू आमचा म्होरक्या आहेस असं प्रत्यक्ष सांगत नाही किंवा मी म्होरक्या असा बिल्लाही देत नाही पण जबाबदारी आपल्या खांद्यावर येते. अश्यावेळी काय करावं ह्याविषयीचं हे पुस्तक आहे.

अश्यावेळी सर्वात आधी करायच्या काही गोष्टी म्हणजे -

१. सगळेजण ह्या प्राॅजेक्टमधे मदत करणार आहेत हे मनांत ठाम भिनवायचं

२. प्रत्येक मदत करणारा/री ह्यातून स्वतःचा फायदा बघणार हे ओळखून त्याला भावणारा फायदा ठरवून ठेवायचं

बाकी भरपूर सांगितलं आहे पण सगळं वरच्या मुद्यांवर आधारित आहे.

'Compelling People: The Hidden Qualities That Make Us Influential' is by John Neffinger and Matt Kohut, seasoned communications professionals.

लेखक म्हणतात १/१० सेकंदात आपला मेंदू ठरवतो की समोरचा माणूस आपल्याविषयी आपुलकी बाळगतो की नाही.

आणि आपुलकी आहे असं आपल्याला वाटलं तर आपण त्याच्या बाजूचे होतो.

जरा पटायला मला जड गेलं.

पुस्तकाचा गाभा असा की ताकद (strength) आणि आपुलकी (warmth) हे दोन्ही वापरून आपण लोकांना आपल्याबाजूने वळवता येतं. वेगवेगळ्या प्रसंगात हे दोन्ही कसं वापरायचं ह्याचं तंत्र लेखकांनी सांगितलं आहे. उदा. सेल्समन सुरुवातीला आपुलकी दाखवून आपल्याला वश करतात आणि शेवटी ताकद दाखवून विक्री घडवून आणतात. एखादं संकट आल्यास नेते आधी दिलासा देतात आणि नंतर कणखर पावलं उचलून संकटाला सामोरं जातात. अशी बरीच उदाहरणं देऊन लेखक आपला मुद्दा पटवून देतात.

दिवस ५६

आजचा विषय (क्र. ०६) भावनिक संपर्क साधण्याची क्षमता (interpersonal skill)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

ह्या क्षमतेच्या कक्षेत भरपूर विषय आहेत - 

negotiation  (वाटाघाटी करणे), 

conflict management (तात्विक संघर्ष करणे),

assertiveness skills (खंबीरपणा), 

refusal skills (नकार देण्याची कला), 

influencing (प्रभाव पाडण्याची कला)

persuasion skills (मन वळवायची क्षमता), 

networking (संबंध वाढवायची कला) and 

motivation skills (प्रेरित करण्याचं कौशल्य) इत्यादी. 

बराच अभ्यास करावा लागणार आहे. 

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे

आज सारांश लिहीत नाही. फक्त आज बघितलेल्या भाषणांच्या लिंक्स देतो.

भाषणं शोधून आणि बघून थकलो😌

पहिलं भाषण -

Negotiation (वाटाघाटी करणे)

3 steps to getting what you want in a negotiation by Ruchi Sinha

दुसरं भाषण -

Conflict management (तात्विक संघर्ष करणे),

The walk from "no" to "yes" by William Ury

तिसरं भाषण -

Assertiveness skills (खंबीरपणा)

How to speak up for yourself by Adam Galinsky

चौथं भाषण -

Refusal skills (नकार देण्याची कला)

How to say NO and discover your inner Arctic mindset by Heidi Alamikkelä

पाचवं भाषण -

Influencing (प्रभाव पाडण्याची कला)

What makes us influential? by Jon Levy

सहावं भाषण -

Persuasion skills (मन वळवायची क्षमता)

The counterintuitive way to be more persuasive by Niro Sivanathan

सातवं भाषण -

Networking (संबंध वाढवायची कला)

The Power of Meaningful Networking by Andrew Griffiths

आठवं भाषण -

Motivation skills (प्रेरित करण्याचं कौशल्य)

The puzzle of motivation by Dan Pink

नववं भाषण -

How motivation can fix public systems by Abhishek Gopalka

दिवस ६६

आजचा विषय (क्र. ०६/१०) भावनिक संपर्क साधण्याची क्षमता (interpersonal skill) (negotiation - वाटाघाटी करणे, conflict management - तात्विक संघर्ष करणे, assertiveness skills - खंबीरपणा, refusal skills - नकार देण्याची कला, influencing - प्रभाव पाडण्याची कला, persuasion skills - मन वळवायची क्षमता, networking - संबंध वाढवायची कला, motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य)

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

ही ॲप्स शोधली

Negotiation 360

ह्या ॲपची सुरुवात स्व-मूल्यांकनाने सुरू होते. वापरकर्ते स्वतःला अनेक गुणधर्मांवर रेट करतात ज्यावर हे ॲप वापरकर्त्याला पाच मूलभूत वाटाघाटी शैलींपैकी एकामध्ये टाकते.

त्यानंतर प्रत्येक वाटाघाटीचं स्कोअरकार्ड बनवून वाटाघाटीतील प्रगतीचा मागोवा घेता येतो.

Making Conflict Work -

हे पण साधारण वरच्या ॲपसारखंच आहे

Speak Up

हे अॅप वापरकर्त्यांना खंबीर संवाद कौशल्याचा सराव करण्यासाठी एक व्यासपीठ देतं

Refuse To Lose

हे अॅप वापरकर्त्यांना ठामपणे आणि प्रभावीपणे नाही म्हणण्यास मदत करण्यासाठी संसाधने प्रदान करतं

The Art of Charm

हे अॅप संवाद, मन वळवणे आणि वाटाघाटी यासह प्रभावशाली कौशल्ये विकसित करण्यासाठी एक व्यापक दृष्टीकोन प्रदान करते. यामध्ये अभ्यासक्रम, पॉडकास्ट आणि प्रभावशाली संवाद कौशल्ये विकसित करण्यावरील लेख समाविष्ट आहेत.

ह्याची लिंक सापडत नाहीये. हे ॲप बनवणारा AJ Harbinger ह्याला विचारलंय. बघू तो काय म्हणतो.

persuasion skills - मन वळवायची क्षमता, networking skills - संबंध वाढवायची कला, motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य वगैरेची ॲप्स सापडली नाहीत

दिवस ७६

आजचा विषय (क्र. ०६/१०) भावनिक संपर्क साधण्याची क्षमता (interpersonal skill) (ह्याचे उपविषय - negotiation - वाटाघाटी करणे, conflict management - तात्विक संघर्ष करणे, assertiveness - खंबीरपणा, refusal skills - नकार देण्याची कला, influencing - प्रभाव पाडण्याची कला, persuasion skills - मन वळवायची क्षमता, networking - संबंध वाढवायची कला, motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य)

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

Negotiation - वाटाघाटी करणे

ह्या विषयावर बऱ्याच गोष्टी आहेत. त्या इकडे डिटेलमध्ये देत नाही. हे वाचा. - Harvard University

Conflict management - तात्विक संघर्ष करणे

मॅकडोनल्डस् ला सतत संघर्षाशी सामना करावा लागतो. त्यांचे ११८ देशांत ४०,००० फ्रॅंचायसी आहेत. त्यांच्याशी संघर्ष, स्थानीय समूहांशी (ज्यांना मॅकडोनल्डस् आपल्याकडे नको आहे) संघर्ष, वेगवेगळ्या देशांशी आणि तिथल्या पार्ट्यांशी संघर्ष, त्यांच्या दोन लाख कर्मचाऱ्यांमधील संघर्ष, ग्राहकांशी संघर्ष (प्रतिदिनी सरासरी ७ कोटी ग्राहक जे दर सेकंदाला ७५ बर्गर खातात😄) …..

ह्या सगळ्या लढ्यांसाठी मॅकडोनल्डस् ने बऱ्याच क्लृप्त्या काढल्या आहेत.

उदा. फ्रॅंचायसी साठी “Partnering for Success” (अर्थात एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ)

वेगवेगळ्या वर्ण, जाती, धर्म असलेल्या लोकांना बरोबर घेऊन काम कसं करायचं ह्याचं प्रशिक्षण

संघर्ष सोडवण्याचे तीन प्रकार (confrontational model, harmony model, regulative model) कुठे आणि कसे वापरायचे ह्याचं प्रशिक्षण

ग्राहकांशी होणारे संघर्ष कसे हाताळावे त्याचं प्रशिक्षण ……

Influencing skill - प्रभाव पाडण्याची कला

The Oprah Effect म्हणजे एखाद्या प्रभावी व्यक्तीने एखाद्या पुस्तकाला प्रशस्ती दिल्यानंतर पुस्तकाच्या विक्रीवर होणारी बढत. आॅप्रा विन्फ्री ही एक प्रसिद्ध influencer आहे. ती १९९६ पासून Oprah Book Club नावाचा टीव्ही कार्यक्रम चालवायची आणि तिला आवडलेल्या पुस्तकांविषयी बोलायची. त्यामुळे त्या पुस्तकांची भरभरून विक्री व्हायची. ह्यावरून Oprah Effect ही संज्ञा रूढ झाली.

Persuasion skill - मन वळवायची क्षमता

स्टीव्ह जॅाब्सला त्याची कंपनी (ॲपल) चालवायला एक कद्दावर/ जबरदस्त माणूस हवा होता. त्याची नजर पडली जॅान स्कलीवर. जॅान स्कली तेव्हां बलाढ्य पेप्सीचा प्रेसिडेंट होता. आणि अॅपल एक छोटीशी कंपनी आणि ती चालवणारा स्टीव्ह जॅाब्सही छोटासा (२७ वर्षांचा). पण त्याच्या मन वळवायच्या कलेमुळे जॅान स्कली पेप्सी सोडून ॲपलचा CEO झाला. स्टीव्ह जॅाब्सने जॅान स्कलीला विचारलेला हा प्रश्न जगप्रसिद्ध झालाय - तुला आयुष्यभर साखरेचं पाणी (पेप्सी) विकत रहायचंय की जग बदलायचंय?

Motivational skills - प्रेरित करण्याचं कौशल्य

पेप्सीची CEO इंद्रा नूयीची ही गोष्ट ह्या कौशल्याचं एक उदाहरण आहे.

ती दरवर्षी पेप्सीच्या ४०० कर्मचाऱ्यांच्या पालकांना एक पत्र पाठवत असे. त्यात तुमचा पाल्य पेप्सीमधे काय काम करतो हे ती सांगे आणि नंतर त्यांचे उपकार मानत असे - पाल्यांचं उत्तम संगोपन केल्याबद्दल.

दिवस ८६

आजचा विषय (क्र. ०६/१०) भावनिक संपर्क साधण्याची क्षमता (interpersonal skill) (ह्याचे उपविषय - negotiation - वाटाघाटी करणे, conflict management - तात्विक संघर्ष करणे, assertiveness - खंबीरपणा, refusal skills - नकार देण्याची कला, influencing - प्रभाव पाडण्याची कला, persuasion skills - मन वळवायची क्षमता, networking - संबंध वाढवायची कला, motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य)

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

Daniel Goleman

गोलमनने भावनिक भागांकाचं (emotional quotient) भावनिक संपर्क साधण्याच्या क्षमतेतलं महत्व जगाला सांगितलं.

Virginia Satir ने कुटुंबांचं मानसिक आरोग्य interpersonal skill ने कसं सुधारतं ह्यावर बरंच संशोधन केलं आहे.

Robert Cialdini चं संशोधन influencing - प्रभाव पाडण्याची कला, persuasion skills - मन वळवायची क्षमता ह्या विषयांवर आहे.

Stephen Covey हा त्याच्या The 7 habits of Highly Effective People ह्या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. त्याने भावनिक संपर्क साधण्याची क्षमता ह्यावर भर दिला आहे.

संघर्ष सोडवण्यावरच एक मह्तवाचं तंत्र म्हणजे TKI model. हे शोधलं Thomas आणि Kilmann ह्या द्वयीनं शोधलं.

Eric Bern नं Transactional Analysis ह्या संशोधनातून पालक, प्रौढ आणि शिशू ह्या आपल्या मनाच्या अवस्थांचा थांग घेतला. ह्यानेच Games People Play ह्या पुस्तकात आपण एकमेकांशी कसे विचित्रपणे वागतो हे दाखवून दिलं आहे.

Five love languages ह्या रचनेतून Gary Chapman ने आपण लोकांना किती प्रकारे प्रेम देतो आणि आपण कसं घेतो हे दाखवून दिलं आहे.

David Cooperride ने लोकांनी एकत्र येऊन Appreciative Inquiry ह्या तत्वानं काय कमालीचं काम होऊ शकतं हे दाखवून दिलंय.

Harvard, MIT आणि Tufts ह्या विद्यापिठानी एकत्र येऊन Program on Negotiation नावाचा एक विभागच स्थापलाय.

पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -

Eleanor Roosevelt, Dalai Lama, Confucius, William Marston, Thomas Harris

दिवस ९६

आजचा विषय (क्र. ०६/१०) भावनिक संपर्क साधण्याची क्षमता (Interpersonal skill)

(ह्याचे उपविषय - negotiation - वाटाघाटी करणे, conflict management - तात्विक संघर्ष करणे, assertiveness - खंबीरपणा, refusal skills - नकार देण्याची कला, influencing - प्रभाव पाडण्याची कला, persuasion skills - मन वळवायची क्षमता, networking - संबंध वाढवायची कला, motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनिक संपर्क क्षमता (interpersonal skill) म्हणजे इतर व्यक्तींचे मूड्स (मानसिक भरती ओहोटी), इच्छा, प्रेरणा किंवा हेतू समजणे आणि त्यावर प्रतिसाद देणे ह्याची क्षमता.

ह्या गुणामधे वाटघाटी करणे (Negotiation), वैचारिक संघर्ष सोडवणे (Conflict management), प्रभाव पाडणे (Influencing), प्रेरणा देणे (Motivating), इतरांशी नातेसंबंध जोडणे (Networking) तसेच एखाद्या गोष्टीस व्यवस्थितपणे नकार देणे हे सर्व येतं.

वापरायची पद्धत -

वरील प्रत्येक घटकात कसं यशस्वी व्हावं ह्यावर भरपूर संशोधन झालं आहे त्याचा अभ्यास करणे

वेळापत्रक बनवून सराव करणे

चान्स मिळेल तिथे वापरून त्यांची नोंद ठेवणे

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.

प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.

२.१ तुमची आंतरवैयक्तिक कौशल्यांची व्याख्या काय आहे आणि ते वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही संदर्भांमध्ये महत्त्वाचे का आहेत? (लोकांबरोबर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी संवाद साधतो. उदा. negotiation - वाटाघाटी करणे, conflict management - तात्विक संघर्ष करणे, assertiveness - खंबीरपणा दाखवणे, refusal skills - काही गोष्टींना नकार देणे, influencing - त्यांच्यावर प्रभाव पाडणे, persuasion skills - त्यांचं मन वळवणे, networking - संबंध वाढवणे, motivation skills - प्रेरित करणे ह्यांसाठी वेगवेगळी तंत्रं वापरावी लागतात. ह्या तंत्रांचा वापर करून लोकांना एकत्र घेऊन आपण जग सुंदर बनवू शकतो)

२.२ जेव्हा तुम्हाला परस्परसंबंध निर्माण करण्यासाठी किंवा संघर्ष सोडवण्यासाठी परस्पर कौशल्यांचा वापर करावा लागला तेव्हा तुम्ही वैयक्तिक अनुभव सामायिक करू शकता आणि तुम्ही त्याच्याशी कसे संपर्क साधला? (बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगता येतील. पण तंत्रं वापरून संवाद साधायचं काम अजून तरी केलं नाहीये.)

२.३ ह्या विषयांवरची काही महत्वाची तंत्रं सांगाल का?

negotiation - वाटाघाटी करणे (Harvard Negotiation Project's Principled Negotiation, Fisher and Ury's Getting to Yes, BATNA, Win-Win or Collaborative Negotiation, Competitive or Distributive Negotiation)

conflict management - तात्विक संघर्ष करणे (Thomas-Kilmann Conflict Mode Instrument, Interest-Based Relational (IBR) Approach, Dual Concern Model, Circle of Conflict Model, Conflict Escalation Model, Mediation and Alternative Dispute Resolution (ADR) Models, VOMP Model)

assertiveness - खंबीरपणा (DESC Model, Broken record technique, Fogging, I-Message Model, ASSERT Model, The Three-Step Assertion Process)

refusal skills - नकार देण्याची कला (Assertive "No", Alternative Options)

influencing - प्रभाव पाडण्याची कला (Six Principles of Influence by Robert Cialdini, The Influencing Styles Model by psychologists Allan R. Cohen and David L. Bradford, The 5 P's Model of Influence by Michael Pantalon)

persuasion skills - मन वळवायची क्षमता (Elaboration Likelihood Model (ELM) by Richard E. Petty and John T. Cacioppo, AIDA Model, Social Proof)

networking - संबंध वाढवायची कला (The 5-Step Networking Process Model, The Strength of Weak Ties Model by Mark Granovetter, The Network Building Blocks Model by Karen Stephenson, The Networking Iceberg Model)

motivation skills - प्रेरित करण्याचं कौशल्य (Maslow's Hierarchy of Needs, Expectancy Theory by Victor Vroom, Goal Setting Theory by Edwin Locke and Gary Latham, Herzberg's Two-Factor Theory, Self-Determination Theory by Edward Deci and Richard Ryan)

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness