Wednesday 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०९/१० - भावनांचा वाटाड्या (Coping with emotions)

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास

दिवस ९

आजचा विषय - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि हे कौशल्य वाढवायच्या पायऱ्या शिकणं. 

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

टीप: उद्या शेवटचा विषय. पुढच्या आठवड्यापासून व्याख्यांच्या पुढचं शिक्षण

आजची प्रगती

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions). अजून एक मस्त व्याख्या मिळाली - भावनांची भाषा येणे

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या (मीच ठरवल्या आहेत. चूकभूल द्यावी घ्यावी) -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

हे वाचतोय/ ऐकतोय -

१ कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात (UCLA), ऐंशीच्य दशकात ‘जंगली घोड्यावर स्वार व्हा’ नावाची एक ध्यानपद्धती कर्करोगपीडितांसाठी बनवली होती. त्या विषयीचा हा लेख.

२. ह्या विषयाचं अबक (ABC) -

उद्या - तणावाशी दोन हात

दिवस १९

लिसा बॅरेट (Lisa Feldman Barrett) बरीच वर्षं ह्या विषयावर संशोधन करतेय. कोणताही प्रसंग आला की मेंदूच्या लाखो पेशी एकत्र येऊन एक ठोकताळा बांधतात. तो ठोकताळा म्हणजेच भावना असं ती म्हणते. भावनिक अपहरण (emotional hijacking) असा नवीन शब्द ऐकला. 

आजचा विषय - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

ध्येय २. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे

दिवसाभरात ज्या भावना मनात आल्या त्या नमूद करणे.

नक्की काय करावं ते कळलं नाही. मग एक कल्पना सुचली. आपण दिवसभर वॅाट्सॲपवर असतो. वेगवेगळे मेसेजेस वाचल्यावर काय भावना निर्माण होतात ते टिपून काढलं. वॅाट्सॲपचा एक मोठा फायदा कळला😃

Dr. Meenal Sohani ह्यांचे ह्या विषयावरचे तीन व्हिडिओ बघितले.

ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे

अतिसंतापाने अकीलीसने काय केलं ही गोष्ट वाचली.

दिवस २९

१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪

आजचा विषय (क्र. ९) - भावनांचा वाटाड्या बनण्याची क्षमता (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे

बनवलं.

दररोज एक तास वेळ देणे

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - सराव करणे (अजुनही ह्या विषयाचा सराव कसा करावा हे कळत नाही)

३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे

खालील बोल शोधले.  

John Lennon - One thing you can't hide - is when you're crippled inside. (तुमच्या आतला अपंगपणा लोकांच्या नजरेतून लपत नाही)

Nicholas Sparks - The emotion that can break your heart is sometimes the very one that heals it... (तुमचे हृदय दुभंगणारी एखादी भावना कधी कधी ती बरे करणारी असते)

Anonymous - "Apologizing doesn't always mean you're wrong and the other person is right. It means you value your relationship more than your ego." (माफी मागण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीचे आहात आणि समोरची व्यक्ती बरोबर आहे. याचा अर्थ हा की तुम्ही तुमच्या अहंकारापेक्षा तुमच्या नातेसंबंधाला जास्त महत्त्व देता.)

दिवस ३९

Coping with emotions ह्या विषयावरचे मी पाहिलेले हे दोन चित्रपट - Dumbo (1941) आणि Inside Out (2015) (हा बघितला नाही. सारांश वाचला होता)

आजचा विषय (क्र. ०९) भावनांचा वाटाड्या (Coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे 

दहा दिवसांपूर्वी दिवसभरात वाॅट्सॅप मेसेजेस वाचून काय भावना मनात येतात हे समजून घेतलं होतं.

आजचं तंत्र - एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आयुष्याचे चढउतार बघणे (दलाई लामाविषयी वाचतो)

आज जे काही शिकेन ते रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे

आजचं तंत्र - एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आयुष्याचे चढउतार बघणे (दलाई लामाविषयी वाचलं)

मनात ह्या भावना आल्या -

१. आश्चर्य - योगायोग असा की बरोबर आजच्याच दिवशी (३० मार्च १९५९) चौसष्ठ वर्षांपूर्वी दलाई लामा भारतात आले

२. राग - शांत स्वभावी तिबेटी लोकांवर स्वारी करून त्यांचा देश काबीज केला

३. दुःख - ६४ वर्ष झाली. पण जग आजही तिबेटी लोकांना त्यांची मायभूमी परत देत नाही

४. कौतुक - इतक्या वर्षानंतरही तिबेटी लोक आशेला धरून आहेत

५. करुणा - ५ वर्षांच्या बाळाला उचलून दलाई लामा बनवलं, २४ वर्षांच्या तरुणाला मातृभूमी कायमची सोडावी लागली

हे व्हिडियो बघितले -

His Holiness Dalai Lama – Escape To India (Part 1)

His Holiness Dalai Lama – Escape To India (Part 2)

दिवस ४९

आजचा विषय (क्र. ०९) भावनांचा वाटाड्या (Coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे

ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.

The Book of Human Emotions (2015) आणि Emotional Intelligence 2.0 (2009)

सारांश

The Book of Human Emotions (2015) by Tiffany Watt Smith

ह्या पुस्तकाचा मूळ उद्देश असा की आपण जगातल्या वेगवेगळ्या भावनांचा अभ्यास केल्यास आपलं भावनाविषयक क्षितिज वाढतं.

लेखिकेने ह्या पुस्तकात जगभरच्या १५६ भावनांचं वर्णन केलंय.

त्याची काही उदाहरणं -

Iktsuarpok (from Intuit culture) - कुणी पाहुणा येणार असल्यास आपण घराच्या आतबाहेर करत त्याची वाट बघतो त्या भावनेला इन्विट संस्कृतीचे लोक (उत्तर ध्रुवाकडे राहाणारे) हा शब्द वापरतात

Awumbuk (Papua New Guinea) - आपले पाहुणे जातात, आपण दार लावून घेतो आणि घरात बघतो तेव्हां एक पोकळी आपल्याला जाणवते. त्या भावनेला पापुआ गिनीचे लोक हा शब्द वापरतात.

Schadenfreude (Germany) - दुसऱ्यावर संकट आलेलं पाहून आपल्याला आनंद झालेली भावना म्हणजे शाडेनफ्राॅइड

स्काॅटिश गेलिक शब्दकोशात दुःख ह्या शब्दाच्या ४९ छटा दिल्यायत.

आॅस्ट्रेलियाच्य पिंटुपी जमातीत भिती ह्या शब्दासाठी १५ शब्द आहेत.

भावनाविषयक जितके शब्द तुम्ही जाणता तितकं तुमचा भावनिक बुध्यांक वाढतो

Emotional Intelligence 2.0 (2009) by Travis Bradberry and Jean Greaves

लेखक म्हणतात की आपल्या भावनिक बुध्यांकाचा (emotional quotient - EQ) आपल्या यशात मोठा वाटा आहे (५८%).

ह्या पुस्तकात आपला EQ वाढवण्याचं तंत्र लेखकांनी दिलंय.

EQचे चार स्तंभ म्हणजे -

Self-Awareness, Self-Management, Social Awareness, and Relationship Management

(स्व-जागरूकता, स्व-व्यवस्थापन, सामाजिक जागरूकता, आणि नातेसंबंध जोपासणे)

त्यानी त्यासाठी ६६ प्रकारचे व्यायाम लिहिलेत.

दिवस ५९

आजचा विषय (क्र. ०९/१०) भावनांचा वाटाड्या (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे

पहिलं भाषण -

The art of stillness by Pico Iyer

सारांश -

पिको अय्यरला प्रवास करायला फार आवडतो. प्रवासवर्णन हा त्याचा व्यवसाय आहे.

तो म्हणतो की उत्पन्न वाढल्यामुळे आजकाल लोक दुसरं घर घेतात, कुणी वीकेंड घालवायला फार्महाउस घेतात. पण माझं दुसरं घर म्हणजे ‘आतला मी’.

(माझा विचार) फार सुंदर कल्पना आहे. ह्या आतल्या घरातली दालनं, सजावट, पोटमाळे … बघण्याची मजाच वेगळी. खिडक्या उघडून फुलांचा सुगंध, मातीचा गंध, समोरच्या सरोवरावरून येणारा थंड वारा, ऊब देणार ऊन … काय मस्त घर आहे. कधीमधी जळमटं काढायला वेळ दिला पाहिजे….

पिको म्हणतो - जर तुम्हाला जगाच्या प्रेमात, जिवंत आणि ताज्या आशेने घरी परत यायचे असेल, तर तुम्ही कुठेही न जाता बसल्या ठिकाणी हा आतला प्रवास करू शकता.

त्याच्या भाषणातले हे आवडलेले शब्द - Inner search engine आणि black hole resort

दुसरं भाषण -

The Gift and Power of Emotional Courage by Susan David

सारांश -

भावना, कष्ट देणारे विचार ही आयुष्याशी केलेल्या कराराची कलमं आहेत.

अस्वस्थता ही अर्थपूर्ण जीवनाच्या प्रवेशाची किंमत आहे.

तुमच्या जिवंतपणाचं हे लक्षण आहे.

मृतांना तणाव नाही, स्वप्नं नाहीत, संघर्ष नाही.

हा एक चांगला विचार सूझन सांगते - मला वाईट वाटतं असं न म्हणता, माझ्या लक्षात येतंय की मला वाईट वाटतंय….. माझ्या लक्षात येतंय की मला राग येतोय …… वगैरे वगैरे

खाली दिलेली भाषणं ऐकली पण आता सारांश लिहित नाही.

The Secret of Becoming Mentally Strong by Amy Morin

All it Takes is 10 Mindful Minutes by Andy Puddicombe 

The Surprising Science of Happiness by Dan Gilbert 

The art of asking by Amanda Palmer

दिवस ६९

आजचा विषय (क्र. ०९/१०) भावनांचा वाटाड्या (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे

ही ॲप्स शोधली

Headspace, Calm, Pacifica, Stop, Breathe & Think

ही ॲप्स ध्यान, प्राणायाम वगैरेंच्या आपल्या प्रवासात आपल्याला मदत करतात ज्यामुळे आपलं भावनिक स्वास्थ्य साभाळलं जातं. मी अजून वापरलं नाहीये.

MoodMission

हे अॅप आपल्याला कठीण भावनांना सामना करण्यासाठी पुराव्यासकट सल्ला देतं. उदा. माझा मूड आज बेकार आहे असं ह्या ॲपला कळवलं की ते आपल्याला त्यावर पाच मोहिमा देतं. त्यामुळे आपला मूड सुधारतो कारण आपल्याला एक ध्येय सापडलेलं असतं.

7 Cups

हे अॅप तुम्हाला प्रशिक्षित श्रोत्यांशी (trained listeners) जोडण्यासाठी आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपलं बोलणं ऐकणारा, भावनिक आधार देणारा हवा असतो. हे ॲप आपल्याला ही मदत करू शकतं.

दिवस ७९

आजचा विषय (क्र. ०९/१०) भावनांचा वाटाड्या (coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे

बऱ्याच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना भावना हाताळण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी वेगवेगळे प्रोग्रामस् आयोजतात.

उदा.

Healthy Minds at Johnson & Johnson ह्या कार्यक्रमात प्रशिक्षण, मानसशास्त्रज्ञांशी संपर्क वगैरेंचा समावेश असतो

Adobe's "Kickbox" Programme

कर्मचाऱ्यांना एक पेटी देतात ज्यात भावना कशा हाताळाव्या, अपयशाविषयी असलेली भिती कशी घालवावी, सृजनता कशी वाढवावी वगैरेसाठी माहिती आणि साधनं असतात

Microsoft's "Quiet Time" programme

एकांतात बसून आत्मनिरिक्षण केल्याने आपण भावना चांगल्या रितीने हाताळू शकतो हे ओळखून मायक्रोसॅाफ्टने हा कार्यक्रम राबवला आहे. काम करताना मधेच ब्रेक घेऊन स्वतःबरोबर वेळ घालवायला कंपनी प्रोत्साहित करते.

हे सगळं झालं कर्मचाऱ्यांविषयी. ग्राहकांशी संपर्क साधताना कंपन्या भावनांचा वापर कसा करतात तेही मी वाचलं.

भावना हाताळणार्या ह्या काही मस्त जाहिराती मी पाहिल्या. त्यांच्या लिंक्स देतो. तुम्हालाही आवडतील.

Budweiser's "Puppy Love" Ad

Coca-Cola's "Happiness Machine" Ad

Nike's "Find Your Greatness" Ad

Google's "Loretta" Ad

Listerine using fear to market the product

दिवस ८९

आजचा विषय (क्र. ०९/१०) भावनांचा वाटाड्या (Coping with emotions) 

आणि आजचं ध्येय -

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे

Richard Lazarus - ह्या मानसशास्त्रज्ञाने cognitive appraisal theory of emotions ह्या तंत्राचा शोध लावला.

Susan David - हिने भावनांचं अस्तित्व मान्य करणं आणि त्यांना स्वीकारणं ह्याचं आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे त्यावर संशोधन केलं आहे.

Marsha Linehan - हिने Dialectical Behavior Therapy (DBT) चा शोध लावला.

John D. Mayer, Peter Salovey, and David R. Caruso - ह्यानी आपलं भावनिक बौद्धिक पातळी मोजायचं Mayer-Salovey-Caruso Emotional Intelligence Test (MSCEIT) हे तंत्र शोधून काढलं.

Elizabeth Kübler-Ross - हिने Kübler-Ross model (शोकाचे पाच टप्पे) शोधलं.

पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -

Daniel Goleman, Viktor Frankl, Dacher Keltner, Tal Ben-Shahar, Karla McLaren

आणि काही तंत्रं -

Emotional Freedom Techniques (EFT), The RULER Approach, The S.T.O.P. Technique, The ABC Model, The Wheel of Emotions

दिवस ९९

आजचा विषय (क्र. ०९/१०) भावनांचा वाटाड्या (Coping with emotions)

आणि आजचं ध्येय - 

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे

आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 

तुमचा नम्र

आजची प्रगती

१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे

व्याख्या - भावनांशी सामना करण्याची क्षमता (coping with emotions) किंवा भावनांची भाषा शिकणे.

क्षमता उंचावण्याच्या पायऱ्या -

१. आपल्या मनात कुठल्या कुठल्या भावना उचंबळतात त्याची नोंद ठेवा. हे करायचा कंटाळा आल्यास प्लुचिकच्या भावनाचक्राचा अभ्यास करा. त्यात ३२ मुख्य भावनांचा उल्लेख आहे

२. कुठल्याही भावनेला धुत्कारू नका. आपल्याच आहेत त्या.

३ खालच्या दोन प्रश्नांची उत्तरे तयार ठेवा -

३अ - कुठल्याही भावनेला सामोरं जाताना आपण कोणता प्रतिसाद सारखा सारखा वापरतो? उदा. विनोद किंवा कोट्या करणे, हसणे, काहीही प्रतिसाद न देणे, विचित्र प्रतिसाद देणे, फक्त दुखवण्यासाठी प्रतिसाद देणे वगैरे.

३ब - भावनिक सामना टाळण्याची आपण कुठली कृती करतो? उदा. सतत टीवी बघणे किंवा मोबाईलवर सतत भ्रमण करणे, व्यसनांकडे वळणे, कंप्यूटर गेम खेळणे वगैरे

४. दररोज थोडा वेळ ध्यान करा

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.

प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.

२.१ भावनांचा सामना करण्याची तुमची व्याख्या काय आहे आणि वैयक्तिक वाढ आणि आरोग्यासाठी ते महत्त्वाचे का आहे?

व्याख्या - भावनिक अनुभवांना ओळखणे आणि त्यांना प्रतिसाद देणे.

फायदे - Emotional Awareness, Resilience, Improved Relationships, Stress reduction

२.२ भावनांना तोंड देण्याच्या निरोगी आणि अस्वास्थ्यकर पद्धतींमधला फरक काय? आणि निरोगी सामना करण्याची धोरणे कुठली?

निरोगी वागणूक - Emotional Awareness, Problem-Solving:, Seeking support, Self care

अनिरोगी वागणूक - Avoidance (टाळणे, नाकारणे), Substance Abuse (नशेच्या आहारी जाणे), Self-Harm (स्वतःला इजा करून घेणे), Emotional Eating (अवास्तव खाणे)

२.३ काही सामान्य भावनिक ट्रिगर (चाप) काय आहेत आणि ते कसे हाताळायचे?

चाप (triggers) - Criticism or Rejection, Failure or Mistakes, Loss or Grief, Conflicts, Uncertainty or Change

हाताळायचे मार्ग - वरच्या कुठल्या चापाला कसं हाताळायचं हे चक्क लिहून काढणं हाच एक मार्ग मला दिसतो. त्या आधी कुठली तंत्र वापरावी ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. उदा. Lazarus and Folkman's Transactional Model of Stress and Coping, Emotion-Focused Coping and Problem-Focused Coping, Cognitive Appraisal Theory, Dual-Process Model of Coping with Bereavement, Acceptance and Commitment Therapy, The Five-Stage Model of Grief

२.४ ह्या विषयावरचे तुमचे अनुभव सांगाल का?

एव्हढ्यात नाही

२.५ मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकारी ह्यांना त्यांच्या भावनांचा सामना करण्यासाठी आपण काय मदत करू शकतो?

Active Listening, Asking open ended questions, Not giving unnecessary suggestions, Offeting to help, only if asked

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness