Wednesday 16 August 2023

जीवन कौशल्ये (Life skills or 21st century skills) - ०५/१० - संवादक्षमता (Communication skill)

Photo credit - UNICEF

अभ्यासक्रम 

१. ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं

२. ह्या विषयाचा एक सिद्धांत समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे आणि ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणं 

३. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे आणि ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणं 

४. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणं 

५. ह्या विषयावरच्या काही पुस्तकांचे सारांश वाचणं

६. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणं आणि ती ऐकणं 

७. ह्या विषयावरची मोबाईल apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणं 

८. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणं

९. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणं

१०. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणं

सराव (दररोज एक तास वेळ देणे)

पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल ह्याचं वाचन

११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे

२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)

४१ ते ६० मिनिटं - ह्या विषयाचा सराव करणे (म्हणजे एखादं तंत्र वापरून पाहणं)

शंभर दिवसांचा प्रवास   

दिवस ५
आजचा विषय - संवाद कौशल्य (communication skill)
आणि आजचं ध्येय - ह्या विषयाच्या व्याख्या पाठ करणं आणि ह्या गुणामुळे काय फायदे होतात ते समजून घेणं. 
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
व्याख्या -
संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे वगैरे… बापरे. ऐकायचे एवढे प्रकार? एका कानाने ऐकणे आणि दुसऱ्या कानाने सोडणे एवढच माहित होतं)
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे😀)

दिवस १५
ह्यातलं एखादं तंत्र आज वापरणार - अभिप्राय देण्याच्या तीन पद्धती पूर्वी वाचल्यायत - मॅकिन्सी, स्टॅनफर्ड आणि SKS. त्यातली एखादी आज वापरतो
आजचा विषय - संप्रेक्षण क्षमता (Communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
ध्येय १. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)
ध्येय २. ह्या विषयाचं एक तंत्र समजून घेऊन रोजच्या आयुष्यात वापरून बघणे
फिल डॅनियल्सचं ‘थांबवा-चालू ठेवा-सुरू करा’ (SKS Model - Stop doing Keep doing Start doing) हे तंत्र आज वापरलं.
बायकोला वही पेन देऊन माझ्या विषयी थांबवा-चालू ठेवा-सुरू करा हे लिहायला सांगितलं आणि मी तिच्याविषयी लिहिलं. पहिल्यांदाच हा प्रयोग केला. आता एका महिन्यानंतर काय प्रगती झाली ते तपासणार. प्रगती झाली तर मस्त.
ध्येय ३. ह्या विषयावरची एखादी गोष्ट वाचणे
हुब्रिस म्हणजे जाणूनबुजून एखाद्याचा अपमान करणे. महाभारतातली ही गोष्ट हुब्रिसचं उदाहरण आहे. ही वाचली - दुर्योधन मयसभेतल्या तलावावर फरशी समजून चालला आणि पाण्यात पडला. त्यावर द्रौपदी जोरात हसून म्हणाली - आंधळ्याचा मुलगा. धडपडणारच.
ह्या अपमानामुळे अखेर महाभारत घडलं.

दिवस २५
१०० दिवसांचं ध्येय - दहा विषयांचा तज्ञ होणं 💪
आजचा विषय - संप्रेषण किंवा संप्रेक्षण क्षमता (communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)
२. ह्या विषयाचं वेळापत्रक बनवणे
बनवलं
दररोज एक तास वेळ देणे (त्याउप्पर अर्धा तास ५०० शब्द लिहिणे आणि मोठ्याने वाचणे असं ठरवतोय)
पहिली १० मिनिटं - व्याख्या, पायऱ्या, महत्वाची तंत्रं (techniques) आणि थोरांचे बोल
११ ते २० मिनिटं - आतापर्यंत टिपलेली प्रगती वाचणे
२१ ते ४० मिनिटं - एखादं सदर वाचून त्याचा सारांश काढणे (सदरांची यादी बनवली आहे)
४१ ते ६० मिनिटं - सराव करणे
३. ह्या विषयावरचे थोरांचे बोल शोधणे
हे बोल शोधले.
Steve Forbes - "Your brand is the single most important investment you can make in your business.” (तुमचा ब्रँड किंवा गुणवत्तेचा ठसा ही तुमच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे)
Stephen Covey - Most people do not listen with the intent to understand; they listen with the intent to reply (बहुतेक लोक समजून घेण्यापेक्षा उत्तर देण्याच्या उद्देशाने ऐकतात.)
William Wordsworth - Fill your paper with the breathings of your heart (लेखन म्हणजे आपल्या हृदयस्पंदनाने बहरलेला कागद)

दिवस ३५
Communication skill ह्या विषयावरचे चित्रपट मला बघायचे आहेत. तुम्हाला माहित आहेत का?
मी पाहिलेले हे दोन चित्रपट - 
The King’s speech (किंग जॉर्ज सहावा याने आपल्या तोतरेपणावर कशी मात केली याची ही कथा)
Arrival (परग्रहावरून आलेल्या लोकांशी संवाद स्थापित कसा केला गेला ह्याची कहाणी)
आजचा विषय (क्र. ०५) संप्रेक्षण/ संवाद क्षमता (communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचं एखादं नवीन तंत्र वापरून बघणे (मागच्या वेळी ५०० शब्द लिहून काढणे हे तंत्र वापरून बघितलं होतं)
आज जे काही शिकेन ते कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. ह्या विषयावरचं नवीन तंत्र वापरून बघणे
आज ठरवलं की आपण बोलतानाचं व्हिडियो रेकाॅर्ड्ंग करायचं.
केलं.
खतरनाक अनुभव.
मला वाटलं होतं की मी लोकांशी ठीकठाक बोलतो. पण समोरच्या कॅमेराने माझी काशी केली.
पण धीर सोडायचा नाही हे नक्की केलं.
एक चांगला सल्ला यूट्यूबवर मिळाला
दररोज फक्त ८ मिनिटं द्या
पहिली २ मिनिटं - काहीही बोला
नंतरची २ मिनिटं - तुमचं रेकाॅर्डिंग ऐका
नंतरची २ मिनिटं - तुमचं रेकाॅर्डिंग पहा (ऐकू नका)
नंतरची २ मिनिटं - तुमचं रेकाॅर्डिंग ऐका आणि पहा आणि ते कसं सुधारतां येईल ते बघा

दिवस ४५
आजचा विषय (क्र. ०५) संवादक्षमता (communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. ह्या विषयावरच्या पुस्तकांचे सारांश वाचणे
ह्या दोन पुस्तकांचे सारांश वाचले.
Skill with people (1968) by Les Giblin आणि Made to Stick (2007) by Chip Heath.
सारांश -
Skill with people (1968) by Les Giblin, a pioneer of the personal development industry
ह्या पुस्तकातलं मला सगळ्यात आवडलेलं वाक्य - लोकांशी बोलताना तुम्ही कितीदा सगळ्यात महत्वाच्या विषयावर बोलता? तो महत्वाचा विषय म्हणजे ‘ते’ (तुम्ही ज्यांच्याशी बोलताय ते).
बाकीची बरीच माहिती टिपिकल अमेरिकन वातावरणाला शोभेल अशी आहे (म्हणजेच, जे काही बोलता त्याने तुम्हाला काय फायदा होईल ते बघा)
उदा. त्याच्या विषयी माहिती विचारा, त्या माणसाचं गुणगान करा, त्याच्याशी बोलताना त्याच्या नावाचा उल्लेख करा, त्याने बोललेलं कान देऊन ऐका, मी/ माझं/ मला हे शब्द टाळा, त्याच्या मताशी सहमत रहा, त्याने सांगितलेल्या माहितीवर प्रश्न विचारा, तुमचं एखादं काम करवून घ्यायचं असेल तर ते काम करून त्याचा कसा फायदा होईल ते सांगा, डोळ्यात खोलवर पाहून थॅंक्यू म्हणा वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न जरा नाटकी वाटले.
आपल्या इकडे असं कोणी बोललं तर त्याल हे ऐकायला मिळेल😀 - “हे सगळं ठीक आहे. आता मुद्यावर ये. किती पैसे पाहिजेत?”
ह्या पुस्तकातला हा एक मुद्दा मजेदार वाटला - सुरुवातीला छोटे छोटे ‘हो’ घ्या (micro yeses) म्हणजे शेवटचा मोठा ‘हो’ घ्यायची पार्श्वभूमी तयार होईल. आणि ह्यावरचं एक उदाहरण आठवलं (लता रफीचं आराधनातलं गाणं😀) -
तो - (क्या) बागेंमें बहार है?
ती - हां
तो - (क्या) कलियोंपे निखार है?
ती - हां
तो - (क्या) आज सोमवार है?
ती - हां
आणि शेवटचा मोठा हो घेणारा प्रश्न
तो - (क्या) तुमको मुझसे प्यार है?
ती - हां बाबा हां
😀
अजून एक आवडलेला भाग म्हणजे चुका दाखवताना चुकीवर फोकस करा, चूक करणाऱ्यावर नाही. आणि दोघं मिळून चूक सुधारा.
Made to Stick (2007) by Chip Heath
आपण जे बोलतो ते लोकाच्या लक्षात कसं राहील ह्या विषयावरचं हे पुस्तक आहे.
लेखकाने परिणामकारक संवादाचं SUCCES हे तंत्र सांगितलं आहे.
१. Simplicity - संदेश सर्वांना कळेल अश्या सोप्या भाषेत करावा. त्यामुळे तो लोकांच्या लक्षात राहातो. (example of high concept pitch - Canada pitch - “We are like France without the attitude”)
२. Unexpected idea - काही तरी अनपेक्षित बोललं तर ते लोकांच्या लक्षात राहातं (example of breaking the pattern) - Atkin’s diet slogan - Don't go on a diet. As long as you eat healthy food and keep fit you'll be fine!
Heart attack grill नावाच्या हाटेलाने असलं अनपेक्षित नाव ठेवल्यामुळे ते जगभर प्रसिद्ध झालं. त्यांनी मेन्यूही अनपेक्षित ठेवला. उदा. Triple bypass hamburger. त्यांच्या वेट्ररेसेस नर्सेसच्या गणवेषात असतात
३. Concrete - तुमच्या वाक्यामुळे लोकांच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहू शकलं तर ते बराच काळ लक्षांत राहातं. उदा. हाटेलच्या महिला कर्मचाऱ्यांना दिलेला संदेश - तुमच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत तुम्ही जसे वागाल तसं इथे वागा.
४. Credible - तुमच्या संवादात आकडेवारी (statistics), संशोधन (research), तक्ते वगैरे असल्यात लोकांच्या नीट लक्षात राहातं. Sinatra test ही एक नवीन कल्पना समजली. फ्रॅंक सिनात्राचं गाणं (If I can make it there, I'll make it anywhere) हे एक विश्वासार्हतेचं प्रतिक मानलं जातं.
५. Emotional - उदा. आम्हाला जिम् ला जायला वेळच मिळत नाही असं म्हणणाऱ्यांना असं समजावल्यास त्यांना ते दीर्घकाळ लक्षात राहातं - मेहनतीचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक कामामुळे किती कॅलरीज खर्च होतात हे कळलं तर आपण काम करतो म्हणजे जिम् चं करतोय असं वाटायला लागतं
६. Stories - परिणामकारक गोष्टी वापरून संदेश दिल्यास तो कायमचा लक्षात राहातो
हे वाचताना गोष्टींचे तीन प्रकार कळले - The Challenge Plot or a David and Goliath plot, The Connection plot (Story about bridging relationship gaps, for example, racial or religious), The Creativity or MacGyver Plot (solving a long-standing problem)

दिवस ५५
आजचा विषय (क्र. ०५) संवादक्षमता (communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांची यादी बनवणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. ह्या विषयावरच्या TED व्याख्यानांचे सारांश काढणे
भाषण पहिलं - 5 ways to listen better by Julian Treasure, Sound consultant
सारांश
प्रत्येक दिवसाच्या आपल्या संवादात अंदाजे ६०% वेळ ऐकण्यात घालवतो. पण त्यातलं फक्त २५% आपण लक्षात ठेवतो. हळूहळू आपली ऐकण्याची कला आपण विसरतोय.
ऐकणं म्हणजे काय? ऐकणं म्हणजे कानावर पडलेल्या ध्वनीचा अर्थ लावणं.
आपण आवाज पकडून ठेवण्याचे नवनवीन शोध लावले. उदा. कागदावर उतरवणे, आवाज रेकॅार्ड करणे वगैरे. त्यामळे ऐकण्याकडे आपलं लक्ष कमी झालं. आणि जगातला गोंगाट वाढल्याने ऐकणं म्हणजे एक थकवा आणणारी गोष्ट झाली आहे.
जुलियन आपली ऐकण्याची कला वाढवण्यासाठी पाच साधे व्यायाम सांगतो.
१. दिवसातली तीन मिनिटे शांततेत घालवा.
२. काही काळ आवाजाचा मिक्सर ऐका. किती प्रकारचे आवाज एकाच वेळी आपल्या कानावर पडतायत ते कान देऊन ऐका.
३. घरात/ हापिसात येणाऱ्या नेहमीच्या आवाजातलं संगीत ऐकण्यासाठी थोडा वेळ काढा उदा. वॅाशिंग मशीनचा आवाज ऐकणे
४. हा मुद्दा काही नीट कळला नाही☹️ (The next exercise is probably the most important of all of these, if you just take one thing away. This is listening positions -- the idea that you can move your listening position to what's appropriate to what you're listening to).
५. RASAचा वापर करा - Receive, Appreciate, make Sounds (hmm, OK, oh etc), Ask questions
भाषण दुसरं - What you discover when you really listen by Hrishikesh Hirway
हृषिकेश हिरवे हा स्वतः एक संगीतकार आहे. त्याने कित्येक संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की त्यांच्या प्रत्येक गाण्याचा प्रवास कसा झाला, प्रत्येक धुन कशी खुलत गेली वगैरे. हे सगळं कळल्यामुळे तो त्याचं संगीत जास्त enjoy करू शकला.
हे सगळं करताना त्याच्या लक्षात आलं की लोक जेव्हां बोलतात त्यातही बरेच पदर असतात. बरंच बोलतात ते का बोलतात, त्यांना आणखी काही बोलायचं असेल ते राहून गेलं का, बरंच काही सांगायचं असेल पण सांगितलं जात नाही वगैरे वगैरे. आपण नीट लक्ष देऊन ऐकल्यास आपल्याला बरेच शोध लागतात. थोडक्यात काय, आपण हे सगळे पदर खुलवण्यासाठी ऐकलं पाहिजे.
भाषण तिसरं - The transformative power of classical music by Benjamin Zander, Composer
सारांश -
८० वर्षांचा संगीतकार (composer). पण त्याची ऊर्जा बघण्यासारखी आहे. तो कंपन्यांमध्ये भाषणं देतो, गरीब वस्तीत भाषणं देतो, अनाथ मुलांपुढे बोलतो. त्याचं स्वप्न एकच - जगातल्या सगळ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करणं.
फक्त त्याचा उत्साह बघायला हे भाषण ऐका. सगळ्यात आवडलेलं त्याचं वाक्य - कोणाशीही बोलताना हे गृहीत धरून बोला की हे माझं त्याच्याबरोबरचं शेवटचं वाक्य आहे. तुमच्या बोलण्याचा सूरच बदलून जाईल.

दिवस ६५
आजचा विषय (क्र. ०५/१०) संवादक्षमता (communication skill)
आणि आजचं ध्येय -
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन.
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. ह्या विषयावरचे mobile apps शोधणे आणि वापरायचा यत्न करणे
ही ॲप्स शोधली
ओराय् म्हणजे तुमचा सभाधीटपणा (public speaking) वाढवणारा प्रशिक्षक (coach) आहे.
Voice Analyst
आपल्या आवाजाचं विश्लेषण करणारं हे ॲप आहे.
बोलण्याचा वेग (speed), मात्रा (volume), पट्टी (scale) वगैरेचं विश्लेषण करून आपलं बोलणं सुधारण्यासाठी हे ॲप आहे.
Storytelling ही एक ग्रेट कला आहे.
हे ॲप आपल्याला आपल्या लिखाणात मदत करतं.
आपल्या गोष्टीतल्या सगळ्या पात्रांना न्याय मिळतोय का, आपल्या गोष्टीची रचना (structure) व्यवस्थित आहे का, वातावरणनिर्मिती व्यवस्थित झाली आहे का वगैरे वगैरे
Active listening (लक्षपूर्वक ऐकणं) हा आपल्या संवादक्षमतेचा मोठा भाग आहे. ही क्षमता वाढवायला ही काही ॲप्स आहेत. पण त्यांचा मी अजून नीट अभ्यास केला नाहीये.
Mindful Listening, Focus@Will, ListenWise इत्यादी.

दिवस ७५
आजचा विषय (क्र. ०५/१०) - संवाद क्षमता (communication skills)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. हा विषय व्यापारात कसा वापरला गेला त्याच्या पाच गोष्टी (business stories) शोधणे
Business Storytelling म्हणजे थोडक्यात - काळजाला हात घालणाऱ्या गोष्टी सांगणे
कंपन्या आपला ब्रँड, मूल्ये, ध्येय वगैरेच्या भोवती कहाण्या रचतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून (मजकूर, ॲाडियो, व्हिडियो) लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याने लोकांची निष्ठा मिळवतात.
पहिली कहाणी TOMS Shoes ची
तुम्ही एक जोड पायताण घ्या. त्याचा मोबदला म्हणून आम्ही गरीब देशांतल्या एकाला एक जोड तुमच्या नावाने पाठवतो.
ही त्यांची Business Storytelling आहे.

दुसरी कहाणी Apple ची
आम्ही वेगळे आहोत. आम्ही जग बदलायला जन्माला आलोय.
ही त्यांची बिझनेस कहाणी.
ह्या व्हिडियोतून त्यांनी ती कशी सांगितली आहे ते पहा

तिसरी कहाणी Nike ची
खेळाच्या मैदानात जर जातपात, धर्म, रंग समान असतील तर जगातही तसंच असायला हवं हा संदेश देणारी ही कहाणी

चौथी कहाणी Nespresso ची
We want to have a positive impact (आम्हाला सकारात्मक परिणाम हवा आहे)
“आम्ही पुनर्वापर (recycling) किती प्रकाराने करतो” हे सांगणारी ही कहाणी

पाचवी कहाणी Horlick ची
मुलांचं शरीर आणि मन ह्या दोन्हीची काळजी आम्ही घेतो हे सांगणारं Horlicks चं परीक्षेच्यावेळी गायचं राष्ट्रगीत

दिवस ८५
आजचा विषय (क्र. ०५/१०) संवादक्षमता (communication skills)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. हा विषय समृद्ध करायला ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्यांना हुडकणे
Dale Carnegie - त्याचं How to win friends and influence हे पुस्तक म्हणजे Communications ह्या विषयावरचं एक बायबल झालंय
Marshall Rosenberg - Non violent communication (NVC) ह्या तंत्राचा जनक
Carl Rogers - “Active listening” ह्या तंत्राचा जनक
Joseph Luft and Harry Ingham - Johari Window ह्या तंत्राचे जनक (दोघांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांनी JoHari हा शब्द बनलाय). खरं तर स्वची जाणीव ह्या विषयाखाली हे यायला हवं. पण इकडे लिहून ठेवतो. विसरायला नको.
William Marston - DISC (Dominance, Influence, Steadiness, Conscientiousness) model चा जनक
William Isaacs - OAR (openness, awareness, responsibility) model चा जनक
Judi Brownell - हिने HURIER (Hear, Understand, Remember, Interpret, Evaluate, Respond) ह्या मॅाडेलचा शोध लावला. कसं ऐकावं ह्याविषयीचं हे मॅाडेल आहे.
Annette Simmons - हिने The story factor (२००१) च्या तिच्या पुस्तकात Business Storytelling ही कल्पना मांडली. ह्या विषयावर काम केलेली आणखी काही मंडळी - Peter Guber, Steve Denning, Nancy Duarte, Robert McKee
पुढच्या अभ्यासासाठी टिपून ठेवलेली नावं -
Deborah Tannen, Marshall McLuhan, George Gerbner, Virginia Satir, Erving Goffman, Paul Ekman, Sherry Turkle

दिवस ९५
आजचा विषय (क्र. ०५/१०) संवादक्षमता (Communication skill)
आणि आजचं ध्येय - 
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे
आजची प्रगती रात्री कॅामेंटमधे टाकीन. 
तुमचा नम्र

आजची प्रगती
१. पाच वेळा व्याख्या आणि वापरायच्या पायऱ्या वाचून काढणे
व्याख्या - संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य (Communication skill) म्हणजे प्रभावीपणे माहिती देण्याची आणि प्राप्त करण्याची क्षमता. अर्थात बोलण्याची आणि ऐकण्याची कला.
वापरायची पद्धत -
पायरी पहिली - संवादाच्या वेगवेगळ्या प्रकारांचे बारकावे समजून घेणे (बोलणे/ लिहिणे/ देहबोली किंवा बॅाडी लॅंग्वेज, औपचारिक/ अनौपचारीक, एकाशी बोलणे/ समुहात बोलणे, सक्रिय ऐकणे, भावनापूर्ण ऐकणे, चिकित्सकपणे ऐकणे वगैरे
पायरी दुसरी - वरील प्रकारांसाठी स्वतःची एक शैली बनवणे
पायरी तिसरी - वेळापत्रक बनवून सराव करणे
पायरी चौथी - प्रत्येक प्रकार कुठे वापरता येईल ह्याची संधी शोधत राहून आपल्या कलेचा उपयोग करत रहाणे (योग्य वेळी संवाद न करणे ह्याचा ही सराव करणे)

२. ह्या विषयाच्या तज्ञाला कुठले प्रश्न विचारल्यास आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळेल हे शोधून त्या प्रश्नांची उत्तरं लिहून काढणे.
प्रश्न खाली लिहिलेयत. उत्तरं फार मोठी होतील म्हणून ह्या पोस्टमधे फार लिहीत नाही.
२.१ प्रभावी संप्रेषणाची तुमची व्याख्या काय आहे आणि त्याचे प्रमुख घटक कोणते आहेत?
परिणामकारक संप्रेषण म्हणजे माहिती, कल्पना, विचार आणि भावनांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया.
प्रमुख घटक - clarity, Active listening, Nonverbal communication, Empathy, Adaptability, Respect and courtesy
२.२ सांस्कृतिक फरक किंवा पूर्वाग्रह यासारख्या सामान्य अडथळ्यांवर मात कशी करता येईल? (सांस्कृतिक फरक - समोरच्या व्यक्तीला आधी सांगितलेलं बरं की मला तुमची सांस्कृती माहीत नाही. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. पूर्वग्रह असलेल्याशी न बोलणं बरं. का फुकट वाफ दवडा?)
२.३ जेव्हा तुम्हाला एखादे कठीण संभाषण करावं लागलं त्याचे अनुभव सांगता का?
२.४ सक्रिय ऐकण्याची (active listening) काही तंत्रं सांगू शकाल का? (Pay attention and be present, Avoid interrupting, Use verbal and nonverbal cues, Paraphrase and summarize, Ask open-ended questions, Avoid judgment and assumptions)
२.५ प्रभावी संप्रेषणामध्ये मौखिक संप्रेषणाची (nonverbal communication) भूमिका काय आहे?
उत्तर काढायला जरा अभ्यास करावा लागेल.

No comments:

About Me

My photo
Bangalore, Karnataka, India
My purpose is to manufacture success and happiness